महाराष्ट्र वेदभुमी

विविध नागरी जीवघेण्या,ज्वलंत समस्याबाबत नागरिकांची नगरपरिषद कार्यालयाला भेट

 ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा

कन्हान पिपरी - मागिल कित्येक वर्षीपासुन कन्हान पिंपरी नगरपरिषद अंतर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याऱ्या टाक्या नादुरूस्त अवस्थेत असून पिण्याचे पाणी अस्वच्छ व ब्लिचिंग पावडर औषध न टाकता थेट दुषित पिण्याचे पाणी राहत्या नागरी वस्तीत पुरवठा करण्यात येत असुन नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे.. यावर तात्काळ पाहणी करून उपाययोजना करण्यात यावी... तसेच राहत्या रहवासी नागरी वस्तीतील व अनेक महिन्यापासुन रहदारी महामार्ग हायवेवरील स्ट्रीट लाइट बंद आहे... रात्री सर्वत्र अंधकार पसरल्याने वाहन चालक दुर्घटना ग्रस्त होत आहे.... याकडे  नगरपरीषद, प्रशासना कान्हाडोळा करीत आहे...

दैनदिन भाजीपाला बाजार हा दररोज महामार्गावर भरतो...मात्र नगरपरिषद प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे...यामुळे कुठलाही प्रकारची अनुचित जिवघेणी घटना घडु शकते... अशा.अनेक नागरी ज्वलंत जीवघेण्या समस्येने संपूर्ण ग्रामस्थ त्रस्त असुन यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी.... अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल...

याकरिता ग्रामस्थांनी  नगरपरीषद मुख्याधिकारी दिपक घोडके याची भेट घेत चर्चा करून सांगितले... याप्रसंगी उपस्थित प्रशांत बाजीराव मसार,मधुकर गणवीर, दिपक तिवाडे, विनोद येलमुले, लाला कडणायेके,मोरेश्वर भोयर,विनोद अगुटलेवार, रमेश ठाकरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post