माणगाव :- (नरेश पाटील) माणगाव तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता एसटी स्टँड समोरील हायवेवरती निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सदर अंदोलन लोकसभा संसद मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपवाक्य वापरून अपमानित केल्याबद्दल हा निषेधार्थ पक्षाच्या वरिष्ठ आदेशाप्रमाने आयोजन करण्यात आली आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,वरिष्ठ नेते, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शिवसेना अंतर्गत संघटनांचे पदाधिकारी , शहरप्रमुख व शहरातील पदाधिकारी या सर्वांनी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे म्हणुन माणगाव ता. प्रमुख गजानन अधिकारी यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रक मध्ये केले आहे तसेच वार्तालाप करताना वरील बाबीस पुष्ठी जोडले आहे.
