.
माणगाव :- (नरेश पाटील) १९३ श्रीवर्धन मतदान क्षेत्र संघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ यानी माणगाव तालुक्यातील मोर्बा गाव मतदान केंद्र अनुक्रमांक २२२-०५ येथिल केंद्रास भेटी देऊन मतदान सुरळीत पार पडत असल्याची निरीक्षण करून तेथील केंद्राध्यक्ष अर्थातच रिटर्निंग ऑफिसर यांच्याशी विचार विनिमय करून, मतदान प्रक्रिया सर्व काही सुरळीत पार पडत आहे का ? या बाबी जाणून घेतल्या असता सदर अधिकारी यांनी होय असे उत्तर देऊन सर्व काही व्यवस्थित पार पडत असल्याबाबत उमेदवारास माहिती दिली... दरम्यानाचा काळात मतदान करण्यासाठी मतदार विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने आपली मतदानाचे हक्क बजावण्याकरिता आवर्जून उपस्थिती राहिल्याचे दिसून आले... तसेच महिलांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या... तर दुसरीकडे मतदान क्षेत्र परिसरात पोलीस तसेच होमगार्डस यांचा चोक बंदोबस्त यावेळी दिसत होता... अपक्ष उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांचे प्रेमाचे आहेर म्हणुन ओळखले जाणारे "पाकिट" हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले होते... राजा भाऊ ठाकूर हे जिल्ह्यातील अलिबाग मतदार संघाचे माजी काँग्रेस पक्षाचे आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहे... तर रायगड जिल्हा सह एकंदरीत कोकणात काँग्रेस पक्ष एकही आपले उमेदवार न उतरविल्याने त्याच्या बरोबरीने कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखले जाणारे तसेच स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांचे मतदार क्षेत्र असलेल्या श्रीवर्धन मतदार क्षेत्रामध्ये कॉंग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ते यांनी राजा भाऊ ठाकूर यांना सदर श्रीवर्धन मतदान क्षेत्रात उतरवून जोरदार पांठिम्बा देऊन उमेदवारी लढवण्यास भाग पाडले... पुढे राजा भाऊ ठाकूर यांनी कार्यकर्ते लावलेल्या पोलिंग बूथ येथे भेटी देऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली...
दरम्यान राजा भाऊ ठाकूर यानी या १९३ मतदार संघात येऊन निवडणूक लढविल्याचे जिल्ह्याभर जोरदार चर्चेचा विषय बनला आणि विशेष करून काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्गा यांना अत्यानंद झाला ..एकंदरीत श्रीवर्धन कॉंग्रेस पक्षाला एक नवी संजीविनी मिळवून जिवंत ठेवण्याची कामगिरी बाजावली.. दरम्यान या मतदान केंद्र भेटी वेळी उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांचे चिरंजीव सम्राट राजेंद्र ठाकूर तसेच मोर्बा गाव येथील कट्टर कार्यकर्ते सोबत होते... दरम्यान १९३ श्रीवर्धन विधानसभेचे एकंदरीत संपन्न झालेल्या मतदानाचे टक्केवारी सुमारे ६०.९०% तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सात विधानसभाचे झालेली टक्केवारी सुमारे६८.८० झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती लागली आहे... तर उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांनी वार्तालाप करताना सांगितले कि या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे... कारण कार्यकर्ते यांनी ज्या पद्दीतीने पिंजून काढून माझ्या विजयासाठी जोरदार प्रचार केला आहे.. आणि मतदार बंधू भगिनीही भरपूर आशीर्वाद दिल्याचे ही प्रचार वेळेत दिसून आली आहे...
