महाराष्ट्र वेदभुमी

महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही - ज्ञानदेव पोवार.

 


माणगाव :- (नरेश पाटील) रोजगार, विकास, माहागाई, लोकशाही धोक्यात असणे, घराणेशाही, समस्या, संकटकाळी आणि अपघात ग्रस्त यांना वालीच नसल्याने महाविकास आघाडी शिवाय पर्यायच नसल्याचे मत माजी राजीप सभापती तथा माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी जुना माणगाव येथे गुरुवारी सायंकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांची प्रचार सभेच्या वेळी बोलताना व्यक्त केले... या वेळी ज्ञानदेव पोवार सह उमेदवार अनिल नवगणे, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय तोडणकर, मस्जिद मोहल्ला जुने माणगांव चे अध्यक्ष अब्दुल हाजीते तसेच प्रतिष्ठित मान्यवर अनुक्रमे यासिन परदेशी, सुभाष पारखे, लियाकत परदेशी, सलाम परदेशी, नजीर जामदार, रउफ जामदार, रशीद हाजीते, अकबर परदेशी, मोहमदअली धुंदवारे, जाविद नदाफ, अयुब करवेकर, मजीद ताज व समस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

  ज्ञानदेव पोवार यांनी भाषणाला सुरुवात करताना सांगितले कि अनिल नवगणे यांना उमेदवारीचे AB फॉर्म मिळण्यास उशिरा झाल्याने प्रचार करण्यास उशिरा झाला... असे असले तरी तुमचा सर्वांचा आशीर्वाद उमेदवार अनिल नवगणे यांच्या पाठीशी हवा आहे... अनिल नवगणे नवीन उमेदवार असल्याने त्यांना आमदार होण्यासाठी आपण संधी दिले पाहिजे.., प्रतिस्पर्धी उमेदवार निराधार आणी भरकटणारे भाषण देत आहे.., महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार यांचे उमेदवार अनिल नवगणे हे चांगले उमेदवार असेल्याने त्यांना विधानसभेमध्ये पाठविण्यासाठी आपण सर्वांनी पाठिम्बा दिला पाहीजे ... युतीला मत म्हणजे लोकशाहीला घातक, लोकशाही टिकवायची असेल, पुढे संविधानाला टिकवायचे असेल तर आघाडीला आपला मत गेलाच पाहीजे... प्रतिस्पर्धी उमेदवार हा भाजपाचेच असल्याचे सांगताना पवार म्हणाले कि निवडणूक होऊन काही दिवसांनी भाजपात शामिल होतील... पुढे महायुतीच्या सरकारबाबत बोलताना सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हेच फक्त त्यांना कळते... विकास कामाचा बाबत बोलायला तयार नाहीत, फक्त लाडकी बहीण या विषयावर बोलत आहे... महागाई या विषयावरही बोलायला तयार नाही, सर्व सामान्यांना घर चालवायला त्रास झाला आहे... तर हे सर्व रोखायचं असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही असे सांगून तोच तोच चेहरा असल्याने भाकरी करपले असे तिखट शब्दात संताप व्यक्त करून भाकरी फिरविण्याचा वेळ आली असल्याचे सांगितले... महामार्ग कामाच्या दिरंगाई मुळे अनेक अपघात होत आहेत... यात कैक प्रवासी वर्ग यांचे प्राण गेले आहे... अनेक प्रवासी जखमी होऊन अपंग झाले आहेत... त्यांना विचार पूस करण्यास कोणीही वाली राहिले नाही... यासाठी असा उमेदवार यांना निवडून आणा जो या सर्व समस्या बाबत लक्ष देईल आणि अंती महाविकास आघाडीचा उमेदवार अनिल नवगणे यांना भरघोस मतांनी निवडून आणा... यावेळी संतोष मांजरे, वैभव पोवार, कृष्ण दिवेकर आणी अल्पेश पोवार कार्यक्रम समयी ज्ञानदेव पोवार साहेब बरोबर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post