महाराष्ट्र वेदभुमी

लोकशाहीच्या उत्सवात साहित्यिकांची जन जागृती महत्वाची


  उरण/ दि. १७ नोव्हें.अजय शिवकर: दर महिन्याच्या १७ तारखेला संपन्न  होणारे उरण कोमसाप शाखा मधुबन कट्टा आयोजीत १०९ वे कविसंमेलन उरण विमला तलाव येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.मनोहर वर्तक यांच्या अध्यक्षतेखालील नुकताच संपन्न झाले...

    या वेळी याला कारण राजकारण आणि चला करू मतदान या विषयावर श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे, श्री.हेमंत पाटील, श्री.नरेश पाटील, श्री.भरत पाटील, कुमारी अनामिका राम,श्री.मारूती तांबे, श्री.रामचंद्र म्हात्रे, श्री.अनिल भोईर आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भरत पाटील यांनी केले... राजकारणाची सद्य परिस्थिती पहाता मतदार राजा हा मतदाना बाबत संभ्रमित झाला आहे...अशा परिस्थितीत कवी , साहित्यिक यांनी मतदान करण्या बाबत केलेली जनजागृती लोकशाहीची शान वाढवणारी आहे असे मत या वेळेस सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.मनोहर वर्तक यांनी मांडले...

    सदर कविसंमेलनास जेष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर, मीना बीस्ट,सुभाष मुकादम, दादाराव कोंडीबा, रमेश माळी,माणिक पाटील, गजानन कडू, सुरेश शिंदे, दत्ताराम निलवर्ण ,.चंद्रकांत मुकादम आदि मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post