आकाशझेप फाउंडेशन, जिवोदय फाउंडेशन व वनविभागाच्या संयुक्त उपक्रम
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- दिवाळीनिमित्त पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुंवारा भिवसेन गावातील आदिवासी कुटुंबांना आकाशझेप फाउंडेशन, जिवोदय फाउंडेशन व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमात साडीचोळी व भेटवस्तूंचा आहेर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला...
गत ११ वर्षांपासून अखंडित उपक्रम
तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांनी गावात जाऊन साडी-चोळी, ताट-वाटी, धोतर, पातळ, ब्लॅकेट्स, मिठाई व भेटवस्तू देऊन आदिवासींची दिवाळी गोड करण्याची परंपरा सुरू केली. हा उपक्रम मागील ११ वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. या उपक्रमाला माजी खासदार प्रकाश जाधव, सेवानिवृत्त अभियंता अंगद जाधव, मंदिर पंच कमिटी अध्यक्ष शंकर मरसकोल्हे, सेवानिवृत्त शिक्षक धनराज मडावी, सोनाली काकुनिया, पुरुषोत्तम धोटे, आदिवासी आश्रमशाळा टेकाडी येथील वानखेडे व कापसे, मोहन लोहकरे, प्रशांत लक्षणे, पत्रकार गोपाल कडू, ईश्वर खंगार, सचिन सोमकुवर, मोतीराम रहाटे, कमल यादव, संतोष बोरकर, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नितीन लुंगे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश खांपेकर, तत्कालीन मुख्याधिकारी नंदनवार, राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे, विशाल बरबटे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, रणजित गजभिये, राजेश गोमकाळे, डॉ इरफान अहमद शेख, डॉ प्रमोद भड, विजय शेगावकर, गट विकास अधिकारी सुभाष जाधव, गौरव पनवेलकर, उत्तम वडस्कर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले तर कोषाध्यक्ष दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले...
५० कुटुंबातील व्यक्तींची मोफत तपासणी
दरम्यान रिआन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक तर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ५० कुटुंबातील व्यक्तींची मोफत तपासणी करून औषध वितरण करण्यात आले. आकाशझेप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार, सहसचिव प्रा. ताराचंद चव्हाण, संचालक वैभव तुरक, सदस्य पंकज माकोडे, सतीश राऊत, चंदू कावळे, रिआन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेकचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता मोहोड, मेघा फुटाणे, बिपीन बंसोड, रुचिता नान्हे उपस्थित होते...
