महाराष्ट्र वेदभुमी

रोहा पुगाव येथे मल्लखांब, शिवकालीन शस्त्र दांडपट्टा लाठी काठी पूजन.

पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर) : रोहा तालुक्यात ऐतिहासिक शिवकालीन परंपरा लाभलेल्या मौजे पुगाव येथे मल्लखांब,शिवकालीन शस्त्र दांडपट्टा, लाठीकाठी यांचे विजयादशमिनिमित्तने मोठया उत्साहात पूजन करण्यात आले...

या प्रसंगी प्रथम हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीचे पूजन करत श्रीफळ वाढवून बजरंग बळी की जय पवनपुत्र हनुमान की जय तसेच जय भवानी जय शिवराय हिंदवी स्वराज्य संस्थापक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार जल्लोष करत समस्त ग्रामस्थ व जय बजरंग आखाडा मंडळाचे सर्व सदस्याच्या उपस्थितीत पार हे शस्त्र साहित्यांचे पूजन मोठया उत्साही वातावरणात पार पडले..

शिवकालापासून चालत आलेला आखाडा लाठीकाठी दांडपट्टा मल्लखांब हा मर्दानी खेळ स्वराज्य संस्थापक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात हे मर्दानी खेळ खेळले जात होते यांची परंपरा आजतागयात पुगांव गावातील वस्ताद बाबू येळकर तसेच त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत दत्ताराम येळकर यांनी ही परंपरा कायम ठेवली असता त्यांच्या पश्चात आजही जय बजरंग आखाडा मंडळानी त्यांचे पुण्यस्मरण म्हणून आजही पुगांव गावात मल्लखांब, लाठीकाठी, दांडपट्टा, खेळाला जातो तसेच रायगड जिल्ह्यातील इतर गावात जय बजरंग आखाडा पुगाव गावाचे नाव नावलौकिक आहे... मल्लखांब, लाठीकाठी, दांडपट्टा, इतर प्रकारच्या खेळातील उडया, हा मर्दानी खेळ खेळून प्रेक्षकाचे उत्साह वाढवत त्यांचे मनोरंजन करत उपस्थितांची मने जिंकतात...

Post a Comment

Previous Post Next Post