नवीमुंबई नेरुळ प्रतिनिधी : युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातून बेलापूर विधानसभेसाठी शिवभक्त स्वप्निल घोलप हे इच्छुक आहेत...स्वप्निल घोलप मूळचे शिवजन्मभूमिपुत्र म्हणजेच किल्ले शिवनेरी जुन्नर येथील असून नवी मुंबई स्थित आहेत... तसेच ते वाणिज्य शाखेंचे पदविधर असुन शिपिंग मैनेजमेंट मध्ये त्यानी एमबीए पूर्ण करून स्वतः उद्योजक म्हणून कार्यरत आहेत... गेली दहा वर्षापासून सामाजिक कार्यात मोठा मोलाचा वाटा त्यांचा दिसून येतो... नवी मुंबईतील मराठा समाजाचा आक्रमक चेहरा व सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात... सामान्य नागरिकांचे शैक्षणिक आरोग्य कामगार सहकार विषयक कोणतेही प्रश्न असले तरी ते स्वतः व्यक्तिशः त्यामध्ये लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत...
सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देत असताना भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत होते म्हणून ते स्वतः वकीलकीचे शिक्षण घेत आहेत... आता एलएलबी च्या दुसऱ्या वर्षात ते शिक्षण घेत आहेत...
त्याचप्रमाणे दुर्गमित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांचे पंधरा वर्षापासून अनेक दुर्गसंवर्धन,दुर्गभ्रमंती व असंख्य लोकांना व्यसनापासून दूर करण्याचे व छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले गडकिल्ले प्रत्यक्षात दाखवण्याचे कार्य चालू आहे...
आपल्या इतिहासातून तरुण पिढीने योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे त्यासाठी भव्य अशी किल्ले रायगडवारी, बेलापूर विभागामध्ये भव्य शिवजयंती महोत्सव,शंभूजयंती महोत्सव, संभाजीमहाराज बलिदान स्फूर्ति दिन त्याचप्रमाणे बेलापूर किल्ल्यावर मशाल महोत्सव चालू केलेले आहेत...
एक निस्सीम शिवभक्त म्हणून गेले तीन वर्षापासून स्वराज्य संघटनेत प्रवेश करुन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली ते बेलापूर विधानसभेमध्ये आक्रमकतेने व बेडर पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवताना दिसत आहेत...
कोणताही राजकीय वारसा, राजकीय पिंड व आर्थिक सधन नसले तरी या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा उतरायचा मानस आहे...कारण कुठेतरी ही घराणेशाही, हुकूमशाही, भ्रष्टाचारी चेहरे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चेहऱ्यापासून सामान्यांचे शोषण थांबावे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे...
आमदाराचाच मुलगा आमदार खासदाराचाच मुलगा खासदार मंत्र्याचा मुलगा मंत्री ही प्रथा मोडण्यासाठी मी 100% मैदानात उतरणार आणि सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा आमदार होणार आणि परिवर्तन घडवून आणणार हे निश्चित आहे...
