महाराष्ट्र वेदभुमी

देवेंद्र गायकवाडमध्ये दडलेले देव पणाचे कार्य, कौतुकास्पद.


माणगाव :- (नरेश पाटील) "देवेंद्र" या नावात देवपणाची गोष्ट सर्रास चर्चेत आहे... विशेष करून राजकीय क्षेत्रात याच नावात असलेल्या राजकीय पुढारी यांच्याकडे पाहिले जाते तर अशीच "देवेंद्र" नाव असलेल्या दक्षिण रायगड जिल्ह्यातील मनसे पक्षाचे मा. जिल्हा अध्यक्ष राहीलेले देवेंद्र गायकवाड, होय... तर ते ही या बिरूद ला अपवाद नाही कारण त्यांना शोबेल असे देवपाणाचे "देवेंद्र" चे दर्शन आधोरेखित आहे... तर देवेंद्र गायकवाड यांची कारकीर्द पाहिली तर देवपणाचे दर्शन देवा भाऊनी राबविलेले त्यांचे विविध सामाज उपयोगी कार्य कौतुकास्पद राहिले आहे... त्यांचा साधेपणा राहनीमान, स्वभाव, बोलण, कार्य, निर्णय, देहबोली, अजात सत्रू , निराश्रित घोर गरीब जनता यांना सर्वतोपरी मदतकार्य करणे, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला क्षेत्र, मनोरंजन असो,धार्मिक, अध्यात्मिक अशा नाना क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे... यातील सर्वात मोलाचे योगदान म्हणजे 'निसर्ग चक्रीवादळ' काळात सर्रासपणे देवभाऊ दिसून आले होते... दुर्गम भागात पिढीत लोकांना झळ बसलेल्या आस्मानी संकट काळात शासनाची मदत पिढीत लोकांना जाहिर झाले.. मात्र प्रत्यक्षपणाने त्यांच्या खात्यात काही पैसा जमा होत नव्हता, ही बाब देवेंद्र गायकवाड यांना समजल्यावर त्यांनी थेट माणगाव एस.बी.आय बँकेत अनेक पिढीत लोकांना घेवून भेटून पिडीतदार यांचें पैसे त्यांच्या खात्यात का जमा होत नाही ? पैसा कुठे गायब झाला ? खातेदार यांना सारख्या का चकरा माराव्या लागतात ? तहसील कार्यालयातून शासनाचे अनुदान पैसे रिलीज केले मग पिडीत लोकांनच्या बँक खात्यात पैसेच आले नाही... मग गरीब जनतेने रोज रोज चकरे मारायचा का ? शहरातील लोकांना पैसे जमा होत आहे मग ग्रामीण भागातील लोकांना का नाही ? असा नाना प्रश्न फैलावर घेवून शासना कडून आलेल्या चक्रीवादळचे पिढीतदार यांच्या पैस्याबाबत यादी मागून जाब विचारताच पिढीतदार यांच्या नावातील गूगल ट्रान्सलेशन चूक कर्मचारी मार्फत झाल्याने ही बाब देवेंद्र गायकवाड यांनी तत्कालीन बँक प्रबंधक यांच्या निदर्शनास आणून दिली..त्यामुळे हजारो चक्रीवादळ पिढीतदार यांच्या खात्यात शासनाचे प्रत्येक कुटुंबातील पिढीतदार यांना पैसे सुमारे १५,००० हजार रक्कम रुपये जमा झाले आणि माणगाव एसबीआय बँक ने देवेंद्र गायकवाड यांचे कौतुक केले...तसेच ही बाब दूसर्या दिवशी मीडियामध्ये देवेंद्र गायकवाड यांनी पिढीतदारास केली मदत कामाची बाब मिडियात झळकली होती.. 

दरम्यानचा काळात अनेक स्थानिक भूमी पुत्र यांना माणगाव तालुक्यातील औद्योगिक कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे तसेच बेरोजगार युवकांचे  शिबिर भरवून त्यांचे बायो डेटा एकत्र करून पॉस्को महाराष्ट्र कंपनीमध्ये नोकरी प्राप्त करून दिल्याने हाजारो बेरोजगार युवकांचे करीयर घडले... त्याचबरोबरीने काही कर्मचाऱ्यांच्या कंपनीमध्ये समोर आलेल्या अडचणी सोडवून कामास पुन्हा रूजू केले...

 दरम्यान अडचणीत असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या सहकार्य  केल्याचे बाब लोकांच्या चर्चेत येऊ लागली.. त्यातील देवेंद्र गायकवाड यांची माणुसकी  म्हणजे एक प्रवासी पोलादपूर येथून माणगावकडे रात्री उशीरा अडचणीत सापडला... कोणतीही वाहन त्या प्रवाशास घेत नव्हते त्यामुळे प्रवासी इसम भयभीत होऊन एकादा वाहन थांबेल अशा आशेत असताना अचानक एक चार चाकी जीप सुमारें ८० मिटर रिव्हर्स येवून थांबते आणि सदर रस्त्यावर उभी असलेल्या त्या  प्रवाशाला सुखरुप माणगावात सोडते... प्रवाशानी देवेंद्र गायकवाड बाबत जाणुन घेवून त्यांचे आभार मानले... मात्र देवेंद्र गायकवाड यांना आपला हातातून हे देवपणाचे कार्य घडल्याचे काहीही आठवन नाही कारण आज या गोष्टीला सुमारे दीड दशक काळ उलटून गेला मात्र याबाबत पत्रकार म्हणून नरेश पाटील हे जिवंत साक्षिदार आहे... दरम्यान देवेंद्र गायकवाड यांची सामाजिक बांधीलकीचा विचार केल्यास मनसे पक्ष मार्फत देवेंद्र गायकवाड हे अन्याय झालेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहुन अडचण सोडविण्यााठी नेहमीच अग्रेसर आघाडीवर आहेत... रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील काम लवकरात लवकर होण्यासाठी मोठी आंदोलन केले आणि मनसे पक्ष मार्फत सदर रखडलेल्या कामांना चालना दिल्याने सुमारे ८०% टक्के काम पूर्ण झाले आहे... तसेच आणखी एक यशस्वी जनसेवा कार्य म्हणजे माणगाव एस्टी स्टेन्ड आवारात पावसाळा काळात साचून राहत असलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये मासे पकडण्याचे गळा आंदोलनचे इशारा देताच शासनाने ती बाब तत्काळ दखल घेऊन प्रश्न सोडविले आहे... दक्षिण रायगड जिल्ह्यात मनसे पक्ष वाढीस तसेच उभी करण्यास देवेंद्र गायकवाड यांची परिश्रम भारदस्त दिसून येते... धार्मिक अगर अध्यात्मिक क्षेत्रात देवाभाऊ यानी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसिध्द कीर्तनकार ह.ब.प. इंदुलकर महाराज यांच्या पत्नी ह.ब.प.माऊली कीर्तनकारी सौ.. यानी धार्मिक, अध्यात्मिक तसेच व्यसनमुक्ती विषयावर जनजागृती करून निजामपूर येतील त्यांच्या मूळगावी प्रचंड गर्दीने यशस्वी आयोजन केले होते... तसेच प्रत्येक वाढदिवसाच्या प्रसंगी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले, त्यात बैलगाडी शर्यत असो, गोर गरीब जनते यांना अन्न छत्र, विधी महाविद्यालय येते शिकत असलेल्या काही ग्रामीण भागातील विद्यायार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेतील डिजिटल युगात लॅपटॉप वाटप केले... राजकीय वाटचालीत देवेंद्र गायकवाड यांची इतर अनेक पक्ष नेते बरोबर चांगलें संबंध राहिल्याने निवडणूकी काळात मनसे पक्ष यांचे मदत घेण्यास महायुती येतील पक्ष दिग्गज नेते खा. सुनिल तटकरे, एस्टी महा मंडळचे अध्यक्ष आ. भरत शेट गोगावलेसह यानी देवेंद्र गायकवाड यांची मदत घेण्यास नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात भर व्यासपीठावरून दिसून आले.. आणि मध्यामात त्यांचे मुलाखत दरम्यान खा. तटकरे यांच्या विजयात मनसे पक्षाचा मोठा वाटा आहे..  देवा भाऊ (देवेंद्र गायकवाड) यानी अनेक तालुक्यांत मनसे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांना खेडो पाडी जावून खा. तटकरे चा विजयी होण्यासाठी स्वतः मैदानात उतरुन प्रचार केला. दरम्यानचा काळात रुग्णांना शासनाची उत्तम सेवा मिळावी म्हणूनही वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन उपजिल्हा रुग्णालय माणगाव येते आंदोलन केले.. आणि प्रसंगी रस्त्यावरील होत असलेल्या अपघात प्रसंगी तात्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून सुसज्ज् आयसियू रुग्णवाहिका मिळवून देत आहे त्याच बरोबरीने मनसे पक्षनेते राजठाकरे यांच्या प्रत्येक वाददिवसाला रुग्णांना फळ वाटप तसेच विद्यार्थि यांना साहित्य वाटप असे उपक्रम राबविले... तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात देवेंद्र गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जिल्ह्याचा काना कोपऱ्यात त्यांचे नाव रुजलेले असल्याने खऱ्या अर्थाने लोक प्रेमाने देवेंद्र गायकवाडांमध्ये  देवपण किंबहूना देवाभाऊ म्हणूनच सुपरिचित आहे... दरम्यान देवाभाऊ देवेंद्र गायकवाड यांनी जनतेकरीता अनेक आंदोलन केले... यात प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाचा आवाज उठविण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर ते कोलाड नाक्यापर्यंत पायी चालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसाठी शासनाची झोप उडविली त्याच बरोबरीने देवेंद्र भाऊ यानी दक्षिण रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील बायपास, ओव्हर ब्रीज, अंडर पास सर्व्हिस रोडचे काम रखडल्याने ठेकेदार यांचे कार्यालयीन कॅबिनचे तोड फोड करून जनतेकरीता आपला अंगावर केस घेतलाचेही उदाहरण आहे... तर दुसरीकडे रेपोली जवळ झालेल्या गृहागर तालुक्यातील हेदवी कुटुंबाचे भीषण अपघात मध्ये दहा प्रवासी यांचा मृत्यूवर शासनाचे निषेध नोंदविण्यासाठी निषेध कार्य वाहिले... महाड येतील सन २०२२ काळात मोठा पूर आला होता... आणि मनसे पक्षातर्फे दिवस रात्र अशा सलग २२ दिवस पिण्याचा पाणी, जेवण, नाष्टा, कपडे, जीवनावश्य वस्तू, मास्क सह वाटप देवेंद्र गायकवाड यांच्या नेतत्वाखाली काम पूरग्रस्त लोकांना वाटप करण्यात आले... दरम्यान माणगाव शहराची वाढती लोकसंख्या पाहताच माणगाव ग्रामपंचायतचे रूपांतर माणगाव नगर पंचायत मध्ये केले गेल्याने कर्मचारी यांना कायम पदावर राहण्यासाठीही देवेंद्र गायकवाड यांच्या पुढाकाराने यशस्वी मध्यस्थी करून प्रश्न सोडविले... चक्रीवादळ प्रसंगी विद्युत विभागाने सरसकट वाऱ्यामाप विजबिल ग्राहकांच्या यांच वर लावण्यात आले होते... तर या अन्या विरुद्धही देवेंद्र गायकवाड यांनी विद्युत उपविभागीय कार्यालय येते मोर्चा कादुन ग्राहक यांना विज बिल कमी करण्याची मोलाची कामगिरी बजावली होती... पुढे लोणेरा येतील तंत्र विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा बाबतीत मोठा गोंधळ उडाले होते तर देवेंद्र गायकवाड यांच्या पुढाकाराने येथील हजारो विद्यार्थि यांना न्याय देण्याचा काम केल्याची माहिती आहे आणि कडापे येते मुलींची अनाथ आश्रमाला मोठी मायेची साथ देवून भरीव योगदान कामगिरी बजावली असलेला हा देवा भाऊ देवेंद्र गायकवाड होय...

Post a Comment

Previous Post Next Post