महाराष्ट्र वेदभुमी

ओबीसी नेते सुरेश मगर यांची शामराव पेजे महामंडळाच्या संचालकपदी निवड,


अभिनंदनाचा वर्षाव..! 

कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष सुरेश मगर यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि अर्थिक विकास महामंडळ अंतर्गत शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे... असून त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे...

रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून सुरेश मगर यांची ओळख आहे... सुरेश मगर यांनी रायगड जिल्ह्यात ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी ओबीसीचे आंदोलन उभे केले होते...यासह त्यांनी जिल्ह्यातील कुणबी समाजाचे काम केले आहे... कुणबी समाज नेते म्हणून त्यांची ओळख असून समाजाच्या विविध समस्यासाठी सातत्याने त्यांनी पुढाकार घेतला आहे... संचालक मंडळावर निवड झाल्याने त्याचा फायदा रायगड जिल्हासह कोकणातील कुणबी समाजासाठी होणार आहे‌...त्यांची संचालकपदी निवड झाल्यावर खा. सुनील तटकरे, ना. अदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते शंकराव म्हसकर, शिवराम शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह, ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम, उपसरपंच उत्तम नाईक, उपसरपंच अरविंद मगर, कोळी समाज नेते नवनीतदादा डोलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्ञानेश्वर साळुंखे, कुणबी समाज धाटाव विभागाचे दिनेश राटाटे, केशव भोकटे, नामदेव म्हसकर, युवानेते शशिकांत कडू, चंद्रकांत भगत आदीसह कुणबी समाज उन्नती संघाचे पदाधिकारी, ओबीसी जन मोर्चाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यासह रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post