महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब कोलाड रोहातर्फे संभे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

पुगाव रोहा (नंदकुमार कळमकर )

         लायन्स क्लब कोलाड रोहा तर्फे रोहा तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा संभे येथील इयत्ता १ ते ४ पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले...यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले...तर लायन्स क्लब कोलाड रोहाचे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे यांनी पदाधिकारी व सदस्य यांची ओळख करून दिली... तसेच लायन्स क्लब ही सेवा भावी संस्था असुन या क्लबच्या माध्यमातून चार वर्षात विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचे रविंद्र लोखंडे यांनी सांगितले...

         लायन्स क्लबचा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा सेवा सप्ताह म्हणून ओळखला जात असुन या सप्ताहात लायन्स क्लब विविध उपक्रम सुरु असतात यानिमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना  कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. मंगेश सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि तळागाळातील विद्यार्थ्यानी चांगले शिक्षण घ्यावे,आपल्या कुटूंबाचे नाव व आपल्या गावाचे नाव रोशन करावे या उद्देशाने आम्ही शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहोत...तसेच क्लबचे उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि आम्ही दिलेल्या वह्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा या वहीवर विविध प्रकारचे निबंध लिहून आम्हाला दाखवावे चांगले निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल...

        यावेळी लायन्स क्लब कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ.मंगेश सानप,उपाध्यक्ष डॉ. विनोद गांधी,उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे,सचिव रविंद्र लोखंडे सर, खजिनदार राजेंद्र कप्पु,विश्वास निकम,नंदकुमार कळमकर,विठ्ठल सावळे,दिलीप मोहिते,सामाजिक कार्यकर्ते दिवाण सानप,कुणबी समाजाचे विभागीय अध्यक्ष पांडुरंग सानप,पोलीस पाटील अनंत सानप,सामाजिक कार्यकर्ते मारुती भोसले,आ.पा.रा. सानप यांचा नातू प्रसाद सानप,मुख्यध्यापक प्रिया पवार,शिक्षिका रेश्मा जमादार, अंगणवाडी सेविका,पालक तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते...सर्व उपस्थितांचे आभार शिक्षिका रेश्मा जमादार यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post