शोकसभा आयोजन
माणगाव :- (नरेश पाटील) अवघ्या २४ वर्षाचा युवक यज्ञेश प्रभाकर उभारे याचा अपघाती निधन झाल्याने संपूर्ण खांदाड गाव सुन्न व शोकाकुल झाले आहे... शुकृवारी रात्री उशिरा मुंबई गोवा महामार्गावरील रेल्वे स्टेशनच्या जवळ यज्ञेशचा अपघात होवून दुर्दैवी अंत झाला...
ही बाब खांदाड गावात पसरताच ग्रामस्थाना धक्का बसला... नुकताच वकिली अभ्यास पूर्ण करून माणगाव येते परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली... त्याच्या या झालेल्या हृदयाद्रावक घटनेवर अनेकांना आध्यापही विश्र्वास बसत नाही...
तो एक मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असलेला तरूण होता... सदर गावातील आनेक सामाजिक, धार्मिक, स्नेह मेळावा उपक्रमात आघाडीवर राहत असल्याचे विषय येतील तरूण युवक मंडळचे अध्यक्ष बाळा पोवार यांनी वार्तालाप करताना काही फोटोज्, व्हिडिओ, तसेच माहितीचे आघाडीवर असलेल्या क्षणचीत्र दाखवले...
दरम्यानचा काळात त्याचा जाण्याने आम्हा सर्वांना न भरून येणारे मोठे नुकसान असल्याचे अनेक जण बोलत असल्याची चर्चा आहे... दरम्यान माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.. हे आलेले मरण हे अकालीन मृत्यू आहे... त्याचा आत्म्याला शांती लाभावे तसेच श्रध्दांजली म्हणून एक शोक सभा येथील देवस्थान ठिकाणी आयोजन केल्याचे सांगीतले... यज्ञेश याच्या दुर्दैवी मृत्यू मुळे खांदाड ग्रामस्थ, तसेच युवा वर्गाकडून शोक संदेश तसेच श्रद्धांजली साठी मोर्बा रोड कॉर्नर येते बॅनर लावण्यात आला आहे...
दरम्यानचा काळात खांदाड येतील अनेक तरूण युवक यानी दिवंगत लाडक्या मित्र यज्ञेशचे कोणी स्टेटस तर कोणी व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम वर पोस्ट ठेवून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.. तसेच माणगाव शहरातील अनेक युवक मित्र मंडळ यानी ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून स्वर्गीय यज्ञेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे...
