झिंजेरिया येथिल वाघाच्या हल्ल्यात महिला ठार प्रकरण चिघळले
नागरीकांचे अप्पर तहसिल समोर साखळी उपोषण
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील देवलापार आदिवासीबहुल भागातील झिंजेरिया शेतशिवारात नुकतेच घडलेले वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याचे प्रकरण चांगले चिघळत चाललेले आहे. घटनेनंतर संतापलेल्या जनतेला शांत करण्यासाठी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी जिल्हाधिकार्यांशी बोलून रविवार (दि.२२) ची देवलापार अप्पर तहसील कार्यालयात सभा आयोजित केली होती...मात्र याला जिल्हाधिकारीसह वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे सभा रद्द झाली तेव्हा संतापुन जाऊन जनतेने जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी (दि.२४) नागपूर येथे ठेवलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला तसेच साखळी उपोषण सुरू केले...
घटनेनंतर संतापलेल्या जनतेला शांत करण्यासाठी रविवार (दि.२२) देवलापर तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी मीटिंग आयोजित केलेली होती मात्र या मिटींगला जिल्हाधिकारी सह वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे जनतेचा राग अनावर झाला शेवटी सातशे ते आठशे लोकांचा जमावळा अप्पर तहसील कार्यालय देवलापार येथे जाऊन धडकला तसेच तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी येथे खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री राजेंद्र मुळक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, सचिन किरपान, आदिवासी सोडूनचे मुकेश पेंदाम, जिल्हा परीषद सदस्य शांता कुमरे व हरीष उईक हे सुद्धा उपस्थित झाले. चिघळलेली परिस्थिती पाहता खासदार श्याम बर्वे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे केले मात्र जिल्हाधिकारी यांनी २४ सप्टेंबर ची सभा आटपु द्या त्यानंतर देवलापार येथे सभा घेऊ असे सांगितल्याने उपस्थित जनतेचा तसेच ठिय्या आंदोलनकर्त्यांचा राग अनावर झाला...व २४ सप्टेंबर च्या सभेवर त्यांनी बहिष्कार टाकला...तरी मात्र अपर तहसील कार्यालय देवलापार येथे जनतेने साखळी उपोषण सुरू केल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे.
अखेर हिंसक वाघ जेरबंद
देवलापार क्षेत्रातील झिंझरीया गावातील महीलेवर हल्ला करणार्या वाघाला वन विभागाचा चबुने शनिवार (दि.२१) बेशुद्ध केले. वन अधिकार्यांनुसार टी ११४ नर वाघाला सिल्लारी जवळ संरक्षित वनक्षेत्र २५५ जवळ राधेशाम भलावी यांच्या शेतात सांयकाळी ६ वाजता बेशुद्ध करण्यात आले... एनटीसीएच्या एसओपीनुसार वाघाला गुंगीचे औषध देऊन वाघाला बेशुद्ध केले. वाघाची वैद्यकीय तपासणी केली तो स्वस्थ असल्याने त्याल्या शुद्धिवर येण्याचे औषध दिले... शुद्धिवर आल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. पूढील कार्यवाही करीता वन्यजीव रेस्क्यु सेंटर , गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार आहे...
हिंसक प्राण्यांपासून संरक्षण मिळण्याबाबत जनतेच्या प्रमुख मागण्या
१). बफर झोन मधील सिमांकन क्षेत्रात सोलार प्यानलसह १५ फुटाचे काटेरी कुंपण करण्यात यावे
२) चिंच करण्यात द्वारे मानव हानी झाल्यास दूर करण्यात यावी
३) बफर व कोवर झोन क्षेत्रातील वाघांची गणना करून संख्या जाहीर करून ती वाघांना किती क्षेत्र हवे हे निश्चित करण्यात यावे व अतिरिक्त वाघांना दुसऱ्या क्षेत्रात हस्तांतरित करण्यात यावे
४) वाघाने माणसाची हत्या केल्यास कायद्यानुसार वाघांना प्रशासकीय मंजुरी घेऊन मारण्याची परवानगी देण्यात यावी
५) जंगल क्षेत्रातील लगतच्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी..
६) अप्पर तहसीलदार कार्यालय देवलापार अंतर्गत ७२ गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा.
७ ) डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेचा जीआर रद्द करा आणि बफार क्षेत्रांतर्गत स्थापित केलेल्या गावातील समित्या रद्द करण्यात यावा...
८) प्रलंबित असलेले वन हक्काचे दावे अटी व शर्ती न लावता पूर्ण दावे मंजूर करण्यात यावे...
