महाराष्ट्र वेदभुमी

अंधश्रद्धा निर्मूलन समितिची (अनिस) भव्य कार रॅली


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति (अनिस) च्या उत्तर नागपूर शाखेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर ते रामटेक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते...रामटेक शहरात भव्य स्वागत करण्यात आले...

रामटेक शाखेचे उपाध्यक्ष नानभाऊ उराडे, कार्याध्यक्षा कांचनमाला माकडे व त्यांच्या संपूर्ण टीम ने या कार रॅलीचे भव्य स्वागत केले... गांधी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत पैदल रॅलीत काढण्यात आली...

त्यानंतर संविधान उद्धेशीकेचे वाचन करण्यात आले... समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी रामटेक शाखेच्या कार्याध्यक्षा कांचनमाला माकडे, उपाध्यक्ष नानाभाऊ उराडे, भागवत सहारे, राज्य अनिस सदस्य रामभाऊ डोंगरे, अलका सेलोकर, सुरेखा उराडे, कृपासागर भोवते, दिनेश मून, उमेश फुलबेल, सुरेश धाबर्डे सहित आदि उपस्थीत होते... राज्य अनिस कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी कार रैली ची भूमिका विशद केली. या प्रसंगी बोलताना कांचनमाला म्हणाल्या कि अंधश्रद्धा निर्मूलन करणेसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे...आजही तळागळातील समाजात अंधश्रद्धा फोफावतांना दिसत आहे...

त्यानंतर जोतिबा का संघर्ष या प्रसिद्ध नाटकाचे ६५ वा प्रयोग सादर करण्यात आला...त्यात म. फुलेंच्या भूमिकेत गौतम मघाडे, सावित्रीच्या भूमिकेत वर्षा शहारे, पंडितच्या भूमिकेत अजय राहटे व देवानंद बडगे, काशीबाई च्या भूमिकेत चंदा मोटघरे तर हिरम शास्त्री च्या भूमिकेत रुपेश घोनमोरे यांनी काम केले...कार्यक्रमाचे सुत्र संचालन विभूतीचंद्र गजभिये तर आभार नाना भाऊ उराडे यांनी व्यक्त केले... कार्यक्रमाला जनतेनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..

Post a Comment

Previous Post Next Post