महाराष्ट्र वेदभुमी

सोशल मिडियावर सुरु झालय बँनरयुद्ध...!


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रोप-वे मुद्य्यावरुन सत्तापक्ष व विरोधक आमने- सामने

रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिर परिसरापर्यंत रोपवे बांधण्याबाबत सोशल मीडियावर बॅनरयुद्ध सुरू झाले असून, आमदार आशिष जयस्वाल यांनी सोसल मिडीयांचा माध्यमातुन रोपवेबाबत खुलासा करण्याकरिता विरोधी नेत्यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे...

३० जुलै रोजी रामटेक येथील गांधी चौक परिसरात रोपवे संदर्भात विरोधी पक्षांचे नेते आणि नागरिकांनी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यासंदर्भात आमदार आशिष जयस्वाल यांनी १ ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोपवेच्या विरोधी नेत्यांना खुले आव्हान दिले आहे... सामाजिक कार्यकर्ते राहुल कोठेकर यांच्यासह काँग्रेसचे रामटेक शहर कमिटीचे अध्यक्ष दामोदर धोपटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे रमेश कारामोरे हे आव्हान स्वीकारणारे बॅनर सोशल मीडियावर टाकले असुन व बंँनर सुद्धा लावलेले आहे...  पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिर परिसरापर्यंत बांधण्यात येणार्‍या  रोपवेवरून सत्तापक्ष आणि विरोधक आमनेसामने आले असल्याचे चित्र सद्या निर्माण झाल्याचे दिसत आहे... त्यामुळे रामटेक क्षेत्रातील राजकारण चागलेचं तापत चाललेले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post