कोलाड (श्याम लोखंडे ) :रोहा तालुक्यातील तसेच मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावर -बदलापूर येथील चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचाराचा निषेध आणि नराधमाला तात्काळ फाशी द्या...अशी मागणी करत कोलाड आंबेवाडी परिसरातील महाविकास आघाडीचे नेतेगण, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोलाड आंबेवाडी नाका येथे काळ्या फिती बांधून जोरदार निदर्शने केली...तर काळ रात्रीपासूनच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने भर पावसात देखील ही निदर्शने कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत करण्यात आली..
बदलापूर येथील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी अत्यंत लहान मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने अमानुष अत्याचार केले... ही घटना उघडकीस येताच संपूर्ण राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली एवढेच नव्हे तर सद्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.. या अनुषंगाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती...
मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे हे बंद मागे घेण्यात आला... परंतु जागोजागी तोंडावर तसेच हाताला काळी पट्टी बांधून तसेच काळे हातात काळे झेंडे दाखवून मूक निदर्शने करण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला होता... त्यानुसार केलेल्या आवाहनाला कोलाड आंबेवाडी येथील महाविकास आघाडीचे नेतेगण तसेच कार्यकर्ते यांनी या चिमुकलीला तसेच त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवा यासाठी निदर्शने केली...
महाविकास आघाडी तसेच घटक पक्ष आणि शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रोहा उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख कुलदीप सुतार, व्यापारी संघटना अध्यक्ष महेंद्र वाचकवडे, संभे ग्राम पंचायत सरपंच समिरशेठ महाबळे, संजयजी कुर्ले, शेकाप विभाग प्रमुख योगेशची सानप, उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर खामकर, बाळशेठ धनावडे, शाखा प्रमुख गणेश शिंदे, वैभव जैतपाळ, संदिप माने,.प्रणित तेलंगे यांच्या यांच्यासह तिन्ही पक्षातील तसेच घटक पक्षांचे पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बदलापुर प्रकरणात महाराष्ट्र सरकार जाणीव पुर्वक आरोपींवर कारवाही करण्यास विलंब करत असल्याने सदर बाबीचा काळ्या फित बांधून निषेध केला...
सदर आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी कोलाड आंबेवाडी नाक्यावर शनिवारी सकाळी जोरदार निदर्शने करत हद्दीतील कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीन मोहिते यांना निवेदन सादर करण्यात आले...
प्रतिक्रिया
कोलाड पोलिस ठाणे कार्यक्षेत्र आंतर्गत हद्दितील शाळा कॉलेज सीसीटिव्ही निगराणीत यावे, तसेच मागिल काही दिवसापासून वरसे, पाली या ठिकाणी लहान मुले तस्करी सदृश घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे..तरी गस्त पथकाच्या फेऱ्या वाढवणे, विभागातील आनोळखी व्यक्तिची माहीती घेणे अशा विविध सुचना निवेदनाच्या माध्यमातून दिल्या व सर्व बाबींचा गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक मोहीते साहेब, साहाय्यक नरेश पाटिल यांनी तात्काळ या सर्व बाबीवर कार्यवाहीसाठी सकारात्मकता दर्शवली......चंद्रकांत लोखंडे शिवसेना उप तालुका प्रमुख उबाठा.
