महाराष्ट्र वेदभुमी

उरण प्राथमिक शिक्षक पतपेढी कायम शिक्षकांचे हित जोपासणारी - चेअरमन शर्मिला महेंद्र गावंड


उरण दि २०(विठ्ठल ममताबादे ): उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीची ४८ वी सर्वसाधारण सभा दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती... सदर सभेसाठी जिल्हाभरातून एकूण साडेसहाशे शिक्षक या सभेला उपस्थित राहिले, स्वर्गीय ह. बा. शिंदे गुरुजी यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले, शिक्षकांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या या पतपेढीची सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष चेअरमन शर्मिला महेंद्र गावंड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली, गेली १५ वर्ष उरण तालुक्यात ही सभा झाली नव्हती प्रत्येक शिक्षकाला या सभेची  उत्सुकता होती आणि उरण मध्ये सभा आहे याचा सगळ्यांनाच आनंद झाला. उरणच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे जेएनपीटी या ठिकाणी बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी ही सभा भरवण्यात एक दोन अपवाद वगळता अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात न भूतो न भविष्य अशा पद्धतीने ही सभा पार पडली...भविष्यात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलली.चेअरमन शर्मिला गावंड  यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि आभार मानले...

सभेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माजी व्हाईस चेअरमन  जयदास  घरत, उरणचे कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नरेश मोकाशी,  निर्भय मात्रे,  बबन पाटील,  बळीराम पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर घरत, प्रकल्पग्रस्तांचे अध्यक्ष  गंगाधर पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष मंदारजी रसाळ, जुनी पेन्शन संघटनेच्या महिला अध्यक्ष माजी चेअरमन राजेश्री मोकल, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव आणि विद्यमान संचालक  हितेंद्र मात्रे  ,शिक्षक भारतीचे अध्यक्ष  डांगरकर सर, अपंग संघटनेचे अध्यक्ष  भोडकर सर, जयदास कोळी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  प्रितम वर्तक, जिल्हा सचिव  विकास पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सगळे शिलेदार तसेच १५ संचालक, शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या...सभेतील अनेक विषयांवर चर्चा झाली.मागील वर्षी झालेल्या जनरल सभेचा इतिवृत्त वाचून मंजूर करणे,२०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकानुसार जादा झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, २०२३ -२०२४ च्या पोटनियम दुरुस्तीला मंजुरी देणे,२०२४-२०२५ च्या वैज्ञानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे.२०२४-२०२५ साठी लेखापरीक्षणासाठी ऑडिटरची निवड करणे, २०२४ -२०२५ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे,आयत्या वेळच्या येणाऱ्या विषयावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करणे.या सर्व विषय सभागृह चर्चेला येऊन खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आले. शिवाय निवृत्ती मानधन वाढवावं अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आले...सदर मागणीचा विचार सकारात्मक केला जाईल असे चेअरमन शर्मिला गावंड यांच्याकडून सांगण्यात आले...

सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले... तालुक्यातून आलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष यांचे  पतसंस्थेच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले...सदर सभा यशस्वी करण्यासाठी उरण तालुक्यातील बहुतेक संघटनांनी पुढाकार घेतला त्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरेश मोकाशी, मच्छिंद्रनाथ म्हात्रे ,बबन पाटील,  निर्भय म्हात्रे,कौशिक ठाकूर, पेण  पतपेढीचे संचालक हितेंद्र म्हात्रे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उरण तालुका अध्यक्ष प्रीतम वर्तक ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा चिटणीस विकास पाटील,तालुक्यातील पदाधिकारी  प्रमोद नवाळे , माजी अध्यक्ष दीपक पाटील, देविदास पाटील, जयदास कोळी  ,विश्वनाथ पाटील, किशोर पाटील,रुपेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संचालक अविनाश कोळी, संचालक संदीप पाटील, जासई शाळेचे मुख्याध्यापक सदानंद पाटील,महिला संघटक मोहिनी पाटील ,मीनल माळी ,राजश्री मुंबईकर, उषा मोकल,वनिता पाटील, लहासे मॅडम,वनिता पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली...संगीता गावंड यांनी साकारलेली ह. बा. शिंदे गुरुजींची रांगोळी तील चित्र पाहून उपस्थित शिक्षकांची मने जिंकली...सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव व्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांनी केले..

 पंधरा वर्षांनी उरण मध्ये सभा होत असल्याकारणाने स्थानिकांना मोफत हॉल मिळवून देण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नाने हा सभागृह मोफत देण्यात आला. त्यांचे सुद्धा चेअरमन यांच्या वतीने आभार मानण्यात आले...शेवटी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने राष्ट्रगीतातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post