उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ):पनवेल शहरातील आदई सर्कल जवळ असलेल्या आयप्पा मंदिर समोर राहणारे महिला सामाजिक कार्यकर्त्या व आदर्श गृहिणी शोभा शिवप्पा कंकणवाडी (वय ६७)यांचे दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे...
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक नारायण कंकणवाडी यांच्या त्या आई होत्या...शोभा कंकणवाडी या एक आदर्श गृहिणी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या... प्रेमळ व मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या व गोर गरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणाऱ्या म्हणून त्यांचा परिचय होता...
त्यांच्या मृत्यूने पनवेल शहरात व कंकणवाडी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे... त्यांच्या मृत्यू पश्चात पती,१ मुलगा,३ मुली, ७ नातवंडे असा त्यांचा परिवार आहे...शोभा कंकणवाडी यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे... शिवा संघटना तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे...
