महाराष्ट्र वेदभुमी

श्री सिद्ध नारायण टेकडी,अंबाळा(रामटेक)ला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त


आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नांना यश

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- नागपूर जिल्ह्यातील रामटेक ही दैवी परंपरा आणि संतांचे अधिष्ठान असणारी भूमी आहे.

याच रामटेक तालुक्यात श्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाळा येथे श्री सद्गुरु नारायण स्वामी महाराजांची संजीवन समाधी सुमारे ५०० वर्षांपासून विद्यमान आहे...

त्यामुळे या पवित्र स्थळाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत ' ब ' वर्ग दर्जा देण्याबाबत आमदार प्रवीण दटके यांनी मागील काही दिवसांपासून शासन दरबारी मागणी लावून धरली होती...

यापूर्वी नारायणी टेकडी ला क वर्ग दर्जा प्राप्त होता, दर्जा वाढ होण्याकरिता मा.मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांना श्री सिद्ध नारायण टेकडीस ब वर्ग दर्जा द्यावा तसेच रिटेनिंग वॉल व अन्य कामांकरिता रुपये ३५ कोटी देण्याची मागणी केली होती...

श्री दटके यांनी केलेल्या मागणीचा विचार करून शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अंतर्गत श्री.सिद्धनारायण टेकडीस ' ब 'वर्ग दर्जा जाहीर केला आहे , यामुळे नारायण टेकडी येथे सर्वसमावेशक सोयी सुविधांचा विकास होण्यास गती मिळणार आहे...

त्याबद्दल आ. प्रवीण दटके यांनी मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तथा मा. ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post