महाराष्ट्र वेदभुमी

चिंचवली येथे कोलाड कुणबी समाज विभागाच्या वतीने सन्मान व सत्कार सोहळा..


विशेष प्रतिनिधी कोलाड: शुक्रवार दिनांक २३/८/२०२४ रोजी चिंचवली येथे कोलाड कुणबी समाज विभागाच्या  वतीने श्री किशोरजी मालुसरे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला..किशोरजी मालुसरे तलाठी या पदावर कार्यरत होते....परंतु त्यांची पदोन्नती होऊन तळा मंडळ अधिकारी सर्कल अण्णासाहेब या पदावर ते विराजमान झाले आहेत.... 

त्याचबरोबर कुमारी सावनी नितीन भोसले हिने अभिनव राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात पाचवा तर रायगड मध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे.. तसेच ती इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून अत्यंत लहान वयात तिन्ही खूप मोठे यश संपादन केले असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे...त्यातच कुणबी समाज विभागाच्या वतीने तिचा सन्मान व सत्कार करून तिच्या अभिमानास्पद कामगिरीस शुभेच्छा देण्यात आल्या..


तसेच कुमार श्रीनंद नंदकिशोर भिल्लारे  यांना द. ग.तटकरे कॉलेज माणगाव येथे आदर्श विद्यार्थी म्हणून किताब देण्यात आला आहे...त्यांना तीन वर्षांमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला असून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा कोलाड विभाग कुणबी समाजाच्या वतीने  सन्मान व सत्कार करण्यात आला... 

यावेळी कुणबी समाज विभागाचे अध्यक्ष संदेश लोखंडे , मराठी व्यावसायिक राजेश कदम ,प्रसाद सानप , महेश ठाकूर, रवींद्र मामलुस्कर व दिनेश धनवी ,मारुती मालुसरे, सचिन भिलारे, धनंजय मालुसरे निळकंठ मालुसरे  तसेच चिंचवली ग्रामस्थ  उपस्थित  होते...या सर्व उपस्थितांच्या हस्ते सत्कार व सन्मान कार्यक्रम करण्यात आला...

Post a Comment

Previous Post Next Post