महाराष्ट्र वेदभुमी

जन आक्रोश समिती घेणार अनोखे आंदोलन हाती शेवटचा पर्याय दैवी शक्तीकडे होम हवन


माणगाव :- (नरेश पाटील) 

मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या काम पूर्ण होण्या करिता

गेली दिड दशकाहून अधिक काळ अपूर्ण स्थितीत राहिलेला तसेच रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याकरिता शासकीय, प्रशासकीय, महामार्ग प्राधिकरण अशा विविध स्थरांकडून अपयश दिसत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून दैवी शक्तीचा आधार घेऊन महामार्ग पूर्ण होण्यास "होम हवन" हा धार्मिक विधी उपक्रम हाती घेवून राबविणार असल्याचे माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलताना रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी लढा देत असलेली कोकण जन आक्रोश समिती रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष रणपिसे यांनी वार्तालाभ करताना सांगितले.. 


यावेळी जिल्हा समन्वय संजोग मानकर, माणगाव तालुका अध्यक्ष डॉ. इरफान अंतुले, सचिव रमेश भाई देबे,संतोष भोरावकर, पांडुरंग रणपिसे सह आधी उपस्थित होते... या दरम्यान हा विधी उपक्रम माणगाव शहर येतील एस्टी स्टँड समोर येत्या रविवारी दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता पार पाडणार आहे... यावेळी कोकणातील जन आक्रोश समिती मुंबई येथील सर्व पदाधिकारी, सदस्य ही उपस्थित राहणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post