सचिन चौरसिया प्रतिनिधी
चोरट्यांनी ३ ठिकाणचे कुलूप तोडुन एक्टिवा घेवून पसार
रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामटेक शहरातील चोरीच्या घटना काही होईना थांबेनाशा झालेल्या आहे... दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे... २३ जुलैच्या मध्य रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला... किसान चौकातील एड. संजीव खंडेलवाल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला... चोरट्यांना चोरी दरम्यान कोणतेही मौल्यवान वस्तु न मिळाल्याने चोरांनी त्यांच्या घरची एक्टिवा घेऊन पसार झाले.. घटनेच्या वेळी खंडेलवाल हे बाहेरगावी गेले होते... दुसऱ्या घटनेत किसान चौकातील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते संजय जैन यांच्या शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन कुलूप तुटले नसुन तिथला चोरीचा डाव फसला नाही... तिसऱ्या ठिकाणी किट्स कॉलेज जवळील रवी पडोळे यांच्या पान ठेल्याचे कुलूप तोडून एक हजार रुपयांची नाणी चोरून नेली...
याप्रकरणी रामटेक पोलीस तपास करत आहेत...पोलीस तपासादरम्यान तीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री २.३० च्या सुमारास ट्रीबल सिट मोटारसायकलवर चोरटे चोरीचा प्रयत्न करत असुन सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...
