महाराष्ट्र वेदभुमी

चॉकलेट दाखवून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याने खांब देवकान्हे परिसरातील नागरिक धास्तावले

 


कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे परिसरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याने परिसरातील शाळा,तसेच शिक्षण संस्थाचालक तसेच गावातील नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही टोळी सक्रिय झाल्याने खांब देवकान्हे परिसरातून नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे गावातली तसेच शाळकरी मुलांच्या जीवाला धोका असल्याने थेट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पोलिस बंदोबस्त लावण्याची मागणी या परिसरातून व्यक्त केली जात आहे. 

गुरूवारी ४ जुलै रोजी या परिसरातील सदैव रहदारीचा मार्ग असलेल्या खांब देवकान्हे मार्गावरील धानकान्हे नजिक विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेत सकाळी दहा सुमारास एक अनोळखी इसम दुचाकी सोबत चेहऱ्यावर मास्क लावून उभा राहिला होता त्याच बरोबर तेथून थोड्या अंतरावर खांब कडे जाणाऱ्या दिशेने दुसरी एक चार चाकी कार घेऊन दोन अनोळखी इसम होते तर येथूनच बाहे देवकान्हे कडून श्रमिक विद्यालय चिल्हे या शालेले पाचवी सहावीत शिक्षण घेत असलेले विदयार्थी जात असताना मध्येच दुचाकी वाहन जवल उभ्या आसलेल्या अनोळखी इसमाने त्या मुलांना अडवून चॉकलेट घ्या असे म्हणत पुढे असलेल्या चारचाकी वाहन चालक इसमाला इशारा केला मात्र शाळकरी विदयार्थी यांची गांभीर्यपूर्वक सतर्कता त्यामुळे ते विदयार्थी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या चॉकलेटला बळी न पडता हातामध्ये आसलेल्या सायकल तिथेच सोडून पळ काढत शाळेतील गेट मध्ये प्रेवश करताच दुचाकी आणि चारचाकीवाले इसम बोंब होण्याच्या आता पळ काढत पसार झाल्याने घडलेल्या या साऱ्या प्रकारामुळे मुलांच्यात तसेच येथील ग्रामस्थ नागरिकांच्यात एकच खळबळ उडाली आहे. तर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार दिवसभर आपल्या शाळेतली शिक्षकांना न सांगता घरी आल्यावर आपल्या काकांना सांगीतले तर ही मोठी गंभिर बाब असल्याने हा सारा प्रकाराची माहिती शुक्रवारी शाळेतली मुख्याध्यापक शिक्षक यांना देत या मार्गावरून एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेटचे आमिष  दाखवून मुलाच्या अपहरणाचा यशस्वी प्रयत्न केला होता माञ दैव बलवत्तर म्हणून तो डाव फसला असल्याचे सर्वत्र बोलले जात आसून या बाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब ते पालदाड हा मार्ग जाणारा असून या मार्गाला अनेक गाववस्ती आणि शाळा आहेत त्यामुळे या भयानक घडलेल्या घटनेमुळे आता साऱ्यांचीच झोप उडाली असून सारे ग्रामस्थ धास्तावले आहेत या परिसरात ही बाब प्रथमच घडली असली तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरातील ग्रामस्त आणि शाळा संस्थापक, शिक्षवृंद यांची धाकधूक वाढली असल्याचे समोर आले आहे परंतू यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणीही येथील ग्रमस्थ वर्गाने केली आहे.

तर परीसरात चॉकलेट दाखवून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याने खांब देवकान्हे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत त्यामुळे परिसरातील शाळा संस्था येथील विद्यार्थी वर्ग पालक तसेच ग्रामस्थ यांचा ही मुले पलवणारी ठोली असावी असा संवश व्यक्त केला जात आहे तर या बाबत सदरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिक्रिया 
तालुक्यातील ग्रामीण भाग बहुतांश लोक मोल मजुरी करणारे त्यात आता शेतात खरिपाची भात लागवड करण्याची घाई असल्याने त्यात सारे मग्न असल्याचा गैर फायदा हि टोळी सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे गुरूवारी बाहे गावातली दोन पाचवी सहावीत शिक्षण घेत असले मुल शाळेत जात असताना हा त्यांना एका अनोळखी इस्मानी चॉकलेट चे आमिष दाखवून पलविण्याच बेत आखला होता माञ ही दोन्हीं मुल येतील नामवंत शाळेत चांगलें शिक्षण घेत आहेत येथील शिक्षकांचे असलेले संस्कार तसेच नेहमी शिव छत्रपतींचे विचारांचे पठण करणारे हे बालक असल्याने मोठीं गांभीर्य ओळखून सतर्कता ठेवत पळ काढल्याने बचावले परंतू भविष्यात पुन्हा आशा घटना घडू नये यासाठी सदरील शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांना कळविले आहे तसेच आवश्यक उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.... मनोज थिटे पोलिस पाटील बाहे..

प्रतिक्रिया 
या परिसरात हायस्कूल तसेच काही प्राथमिक आणि अंगणवाडी शाळा आहेत त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे अनोळखी कोणी इसमाच्या अमिष्याला कोणीही बळी पडू नका त्याच्याकडून कोणतेही खाऊ पदार्थ घेऊ नये तसेच शाळेत ये जा करत असताना कोणतेही अनलोखी वाहवर बसून प्रवास करू नका असे आवाहन करत या बाबत परिसरातील शाळांचे शिक्षवृंद तसेच संस्था चालक शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत लवकरच संबधीत अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी करण्यात येणार आहे...

....दीपक जगताप मुख्याध्यापक श्रमिक विद्यालय चिल्हे

Post a Comment

Previous Post Next Post