अलिबाग (सचिन पाटील)
वांद्रे(पश्चिम)दिनांक ३० जून २०२४ रोजी शब्दशिल्प कलाविष्कार मंच,गिरिजा महिला मंच(महाराष्ट्),नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी सभागृह वांद्रे(पश्चिम) येथे राजमाता जिजाऊ पहिले राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते..ग्रंथदिंडी, परिसंवाद, पुरस्कार सोहळे, पुस्तक प्रकाशन, काव्य सादरीकरण आदि कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले...
या संमेलनाला संमेलनाध्यक्ष एकनाथ आव्हाड (साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक)स्वागताध्यक्षा हिरकणी गीतांजली वाणी (शब्दशिल्प कलाविष्कार संघ कार्याध्यक्ष)तर उद्घाटक सचिन गोखले(टिव्ही मालिका,चित्रपट दिग्दर्शक)लाभले होते त्याचबरोबर प्रमुख अतिथी अश्विनी बोरस्ते(महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच अध्यक्षा),सुरेश पवार (गिरजा गौरव प्रतिष्ठान,अध्यक्ष),प्रमोद महाडिक(नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा,कार्यवाह)होते तर संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आयपीएस अधिकारी डॉ.रवींद्र शिसवे,पत्रकार पंकज दळवी,संयोजिका सोनाली जगताप,प्रमुख अतिथी गझलकार कवी रविंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते...महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून ऐन पावसाळ्यातही वेगवेगळ्या क्षेत्रातील रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली होती तर संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीही मनापासून परिश्रम घेत होती...दरम्यान साहित्यिका,समाजसेविका सौ.अश्विनी बोलके यांना 'राजमाता जिजाऊ समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..
