पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर)
रोहा तालुक्यात तसेच कोलाड परीसरात लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाच्या नवीन टीमचा पदग्रहण सोहळा क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी २८ जुलै रोजी तांबडी येथील तत्वराज फार्म येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ चे जिल्हा व्दितीय उपप्रांतपाल एम जे एफ प्रवीण सरनाईक,विशेष अतिथी माजी प्रांतपाल तथा रायगड चा राजा पी एम जे एफ अनिल जाधव, जिल्हा जीएसटी कॉर्डनेटर एम जे एफ विजयकुमार गनात्रा, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, झोन चेअरपर्सन विवेक सुभेकर, लायन देशमाने,चित्रे काका, रविंद्र घरत, रोहा क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब माने, लक्ष्मण शिट्यालकर, सुश्मिता शिट्यालकर,सौ अलगा माने,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष म्हणून डॉ मंगेश सानप याना शपथ देण्यात आली तर सचिव पदी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कोप्पू, उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम लोखंडे,आणि इतर सभासदांनी विविध पदांसाठी शपथ घेतली...
याप्रसंगी प्रवीण सरनाईक यांनी प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की क्लबने मागील चार वर्षात खुप सुंदररित्या केलेल्या कामाचे कौतुक केले आणि येणार्या वर्षी क्लब अधिक जोमाने कार्य करेल येथील मेंबर मुंबईत सर्व्हिस करत समाज सेवा आणि एका सेवाभावी संस्थेचा उत्तम काम करत आहेत असा विश्वास व्यक्त केला तर क्लब ने दोन पर्मनंट प्रोजेक्ट आणि येथील समाज घटकांसाठी विविध उपक्रमातून आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, सामजिक शैक्षणीक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण,यावर आधारित चांगली सेवा देण्याचे काम केले तसेच भविष्य काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी नविन सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मंगेश सानप यांनी क्लबच्या अध्यक्ष म्हणून - निवड केल्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानले आणि दरवर्षीच्या उपक्रमांसोबत अधिक नवीन उपक्रम राबवत ग्रामीण भागातील सर्व सामान्य घटकाला या सेवाभावी संस्थेच्या वतीने अधिक करणार असल्याचे सांगितले. याच समारंभात इंडकशन ऑफिसर म्हणून लाभलेले लायन विजय गनात्रा यांचे हस्ते सौ रिया लोखंडे,सौ अमिता बामणे, दिलीप मोहिते,या नवीन सभासदांना क्लबच्या सभासदत्वाची शपथ दिली...
यावेळी बोलताना गनात्रा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एका पाठोपाठ एक असे कोलाड क्लब गेली चार वर्षे विविध उपक्रम राबवत आहे तसेच विविध स्तरांवर काम करत असल्याची चांगली प्रसिद्धी दिली हे खरेच विशेष आहे. त्यांनी आवाहन केले की येत्या काळात अधिक उपक्रम क्लबमध्ये करा त्याला माझे सहकार्य असल्याचे सांगितले . मावळते अध्यक्ष नरेश बिरगावले यानी उपस्थितांचे स्वागत केले आणि मागील वर्षी सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत मुठवली येथील भवानी माता मंदिर सभागृह परीसरात सुसज्य सुलभ शौचालय उभारण्यात आले तसेच पुगाव येथील गरजु रुपेश अधिकारी दापंत्य यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी लायन नमिता मिश्रा यांच्या विशेष योगदानातून किचन सेट वाटप करण्यात आले सर्व लायन मेंबर्स यांचे पाठबळ त्यामुळेच क्लब एवढे कार्य करू शकला असे सांगितले...
मागील वर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला यात क्लबने उत्सहीपूर्ण दिलेले योगदानातून क्लबचे चार्टर अध्यक्ष डॉ सागर सानप आणि क्लबचे मावळते अध्यक्ष नरेश बिरगावले यांना मिळालेला गोल्डन आव्हाड तसेच कोलाड लायन्स क्लबने विविध उपक्रमात घेतलेली आघाडी याबद्दल क्लबला सिल्व्हर अवार्ड प्राप्त झाल्याने उपप्रांतपाल सरनाईक यांच्या हस्ते त्यांचे गौरव कऱण्यात आले. लायन माधव आग्री, अलंकार खांडेकर, गजनान बामणे, अनिल महाडिक,नंदकुमार कळमकर, भरत महाडिक,सौ पूजा लोखंडे, विश्र्वास निकम,विठ्ठल सावळे, आदी लायन मेंबर्स उपस्थितीत नरेश बिरगावले यांनी मागील वर्षी उत्तम काम तसेच सहकार्य केल्याबद्दल सर्व लायन मेंबर्स यांचे ऋण व्यक्त केले. तद्नंतर नवे अध्यक्ष डॉ सानप यांना उपस्थीत सभासद तसेच मिञ परिवारांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्या लोखंडे आणि रविंद्र लोखंडे यांनी करत आभार मानून याची सांगता करण्यात आली ...
