कोलाड (श्याम लोखंडे)
राज्य शासनाकडून शालेय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. त्याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नगरपरिषदेच्या रावसाहेब कुलकर्णी विद्यामंदिर शाळा क्रमांक 9 येथे शिकत असलेली कु. नुपूर हेमकांत गोयजी हिने 300 गुणांपैकी तब्बल 248 गुण मिळवून रोहा तालुक्यात प्रथम तर रायगड जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चौथा क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकावला...
सदर या परीक्षेची पूर्वतयारी तीचे मार्गदर्शक सुविधा दांडेकर यांनी करून घेतली. या उज्ज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच नगरपरिषदेचे अधिकारी वर्गाकडून कौतूक केले जात आहे तर तालुक्यात प्रथम आणि जिल्हा स्तरावर चौथी आल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी आनंद व्यक्त केला असून तिच्या या घवघवीत यशाबद्दल विविध क्षेत्रातून तिचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....
