कोलाड (श्याम लोखंडे)
माजी आ.अनिकेत तटकरेंच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
रोहा तालुक्यातील पडमगावचे ग्रामदैवत जाखमाता देवी मंदीराचे जिर्णोद्धार करण्यात आले असून गेली दोन दिवस पडम गावात भक्तीमय वातावरण दिसून आले आहे...यावेळी पडम ग्रामस्थ, मुंबई ग्रामस्थ, महिला मंडळ व पंचकोशीतील भाविक या मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमास उपस्थित होते...संपूर्ण उत्सव पडम ग्रामस्थांनी उत्साही वातावरणात पार पाडला...
माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते यावेळी सामाजिक सभागृह व जाखमाता देवी मंदिराचे सुशोभीकरण करण्याचे कामाचे लोकार्पण करण्यात आले...
शनिवारी २९ जून रोजी ते ३० जून रोजी या दोन दिवसात पडम गावात भक्तीमय उत्सव साजरा करण्यात आला... जाखमाता देवी मंदीर पडम नुतन मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम घेण्यात आले... दोन दिवस घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शनिवारी पडम गावातील ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात देवीची नगर प्रदक्षिणा, पुण्यावाचन, सर्व प्रकारांच्या मूर्तीला स्नान, धान्य अधिवास, जागर तर रविवारी गणेश पूजन, ९ ग्रह व देवतांची स्थापना, हवन, देवीची स्थापना, कलश हवन, ध्वज पूजन, महाआरती, महाप्रसाद, भजन व सायंकाळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते... या कार्यक्रमास पडम गावातील ग्रामस्थांनी जाखमाता देवी मंदिराच्या जिर्णोद्धार उत्सव मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पाडला. यावेळी आबाल वृद्धासह, तरुण, महीला मंडळ, माहेरवाशीन, भाविक यांनी उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला होता...
यावेळी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आमदार विकास कार्यक्रमांतर्गत विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास कामातून सामाजिक सभागृह व जाखमाता देवीचे मंदिराचे सुशोभीकरण करणे या कामाचे लोकार्पण माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी माजी अनिकेत तटकरे यांनी जाखमाता आईच्या अर्शिवादामुळे हे मंदिर पुर्णात्वास गेले आहे.
तरुणांनी मंदिर पुर्ण करण्याची अपेक्षा माझ्या कडे व्यक्त केली होती.सर्वांनी जिद्द बांधुन आज हे मंदिर पुर्ण होत आहे.मंदिरात नित्य नियमाने पुजा अर्चा करण्याची आवश्यकता आहे. यापुढे या मंदिरासाठी
निधीची कमतरता पडू देणार नाही. अचारसंहीता संपल्यानंतर १५ लाखाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले. ग्रामस्थांनी मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना मताधिक्य दिल्याने ग्रामस्थांचे यावेळी आभार आमदार अनिकेत तटकरे यांनी मांनले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, माजी सभापती राजश्री पोकळे, माजी जि.प.सदस्य नंदकुमार म्हात्रे, सरपंच अक्षरा डोलकर, माजी सरपंच राजेंद्र पोकळे, माजी सरपंच संदिप चोरगे, मंगेश चोरगे,अनंत देशमुख, जयवंत मुंढे, मयुर खैरे, नवनीत डोलकर, धर्मा कोळी, चंद्रकांत ठमके, अनिल वाटवे, विभा चोरगे, नयनीता डोलकर, निवास खरीवले, गौरव सुर्वे, तानाजी देशमुख, नामदेव म्हात्रे, बोरकर, योगेश ठाकुर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अनंत चौलकर यांनी मंदिर जिर्णोद्धार हा आमच्यासाठी सुवर्ण दिन असल्याचे सांगितले.तर आभार मानताना अमोल टेमकर यांनी मंदिरासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी सर्वतोपरी सहकार्य केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दिघे यांनी केले...
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीर्णोद्धार उत्सव कमिटीचे अनंत चौलकर, अमोल टेमकर, मंगेश भोई, रमाकांत टेमकर, शैलेश टेमकर, प्रेमनाथ भोई, भालचंद्र टेमकर, राहुल टेमकर, जगदीश टेमकर, मनोज टेमकर, नथुराम टेमकर, विजय भोई, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत टेमकर, ज्ञानेश्वर टेमकर, चंद्रकांत चौलकर, संदीप पाटील, अनिल भोई, प्रणित टेमकर यासह पडम ग्रामस्थ, मुंबई ग्रामस्थ, महिला मंडळ व युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले...
