कोलाड (श्याम लोखंडे )
रोहा तालुक्यात इंग्रजी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब तसेच बाजूला असणाऱ्या कालव्याचा रस्ता येथे वनविभाग रोहा तसेच ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम खांब यांच्या संयुक्त विद्यामाने वृक्षरोपण करण्यात आले.सतत चाललेली बेसुमार वृक्षतोड, वनाचा वाढता ऱ्हास यामुळे जंगल संपत्तीला बाधा पोहचत आहे. यामुळे दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होतांना दिसत आहे.यामुळे लवकरच पृथ्वीवरील जनजिवन धोक्यात येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे...
यासाठी अद्याप वेळ गेली नाही.निसर्ग साखळीत बाधा येऊ नये.यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी "झाडे लावा झाडे जगवा,हा संदेश देत वनविभाग रोहा व ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम खांब यांच्या संयुक्त विद्यमाने पेरू, काजु,आवळा,प्राजक्ता, हिरडा,बेरडा, गुलाब आशा विविध प्रकारची फळ झाडे व फुल झाडे यांची लागवड करण्यात आली.तसेच विविध स्थरावरील संस्थेकडून ही वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचा संदेश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांनी दिला...
यावेळी आर.एस..गायकवाड वनपाल खांब,एस एन शिद वनरक्षक खांब, हिरामण मोते वनमजूर, स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापिका रिया लोखंडे, सुप्रिया पाशीलकर, ऋतुजा पवार, प्रतीक्षा धामणसे, रुपाली मरवडे, निलम दळवी, प्रज्ञा माने, प्रियांका चिकणे, मनिषा लाडगे, तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते...

