महाराष्ट्र वेदभुमी

चोंढी येथे शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक फी वाटप,


सोगाव : अब्दुल सोगावकर 

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे शनिवार दि. २९ जून रोजी चोंढी येथील अंगणवाडीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...

         यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच झिराड येथील विद्यार्थिनी अनुष्का पवार हिला ५००१ रुपयांची शिष्यवृत्ती योगेश गावडे(मुंबई) यांच्यातर्फे देण्यात आली, तर अलिबाग येथील विद्यार्थिनी मनस्वी गव्हाणकर हिला शिष्यवृत्ती मदत म्हणून शिल्पा दहात व नागसेन दहात(अमेरिका) यांनी ५००० रुपये व किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांनी ३६०० रुपये असे एकूण ८६०० रुपये देण्यात आले, तसेच परहुरपाडा येथील विद्यार्थी सन्मेष घरत याला शिष्यवृत्ती मदत म्हणून परेश सुर्वे यांनी ३००० रुपये व सचिन शिंदे यांनी २००० रुपये असे एकूण ५००० रुपये देण्यात आले...

          या कार्यक्रमात युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी तर्फे किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सक्षम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शार्दूल काठे यांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात लागणाऱ्या पुढील मदतीसाठी तब्बल २५ हजार रुपयांची देणगी देत यापुढेही सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष शार्दूल काठे यांनी सरपंच प्रसाद गायकवाड यांचे आभार मानले.

          यावेळी किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड, सक्षम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शार्दूल काठे, किसन गायकवाड, विशाल आमले, वासुदेव आमले, ओंकार आमले, योगेश पवार, सचिन सुर्वे, परेश सुर्वे, श्रद्धा किर, आरती पडते, अंगणवाडी सेविका निवेदिता भोईर, मदतनीस सोनाली आमले, विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते...

फोटो लाईन : सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post