उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)
उरण तालुक्यातील पिरकोन गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे उरण पूर्व विभाग अध्यक्ष अनिल घरत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगिताताई ढेरे, आणि डाबर इंडिया कंपनी यांच्या वतीने पनवेल आपटा ग्राम पंचायत हद्दीतील सारसई विभागातील बागेचीवाडी, सोनारवाडी, गोविंदाचीवाडी टोकाचीवाडी खडकीचीवाडी, टपोरवाडी, धनगरवाडी, माडभुवन या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना डाबर इंडिया कंपनी या नामांकित कंपनीचे रिअल मँगो फ्रेश फ्रूट ज्यूस, लोणचं,डाबर नीम टूथपेस्ट, गार्लिक चटणी,वेदिक चहापावडर,पेरू ज्यूस आणि इतर प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सोबतच या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमावेळी आदिवासी महिला भगिनींनी अनिल घरत यांना ओवाळणी करून औक्षण केलं आणि केक कापून जन्मदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या...
युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत यांचा जन्मदिवस एका सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा आणि त्यातूनचं गरीब गरजूवंत लोकांना भेट स्वरूपात काही तरी जीवनावश्यक वस्तूरुपी मदत मिळावी याच उदात्त हेतूने केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून डाबर इंडिया कंपनीचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई विभागातील आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना करण्यात आले...
अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,अध्यक्ष स्नेहल पालकर,संदेश घरत सोबतच सारसई विभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा शिंगाडे आणि आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला भगिनी यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला !.

