महाराष्ट्र वेदभुमी

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड येथे कार्यक्रमांचे आयोजन



जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली पाहणी .

रायगड  :- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दुर्गराज रायगड येथे 20 जून रोजी होत असून रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासनासह विविध शासकीय विभाग सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें,  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली...

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते,

रायगड किल्ला व परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना  सोई सुविधा निर्माण करताना आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. वाहनांचे पार्किंग,  पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध  करण्यात आली आहे...

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध  व्यवस्था करताना  सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी  बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली आहे.  तसेच खासगी वाहनांच्या पार्किंग ठिकाणापासून  देखील बससेवा उपलब्ध आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण गडाच्या चित्त दरवाजाजवळील वाय पॉईंट, बसपार्किंग आणि गडावर विविध ठिकाणी  उभारलेल्या पाच भव्य स्क्रीन वर करण्यात येणार असून शिवप्रेमी नागरिकाना या परिसरातून पाहता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post