महाराष्ट्र वेदभुमी

पुन्हा वाघाने घेतला एका शेतकर्‍याचा बळी वाघ आणि मानवामधला संघर्ष सुटणार कसा?

 


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

देवलापार वनपरीक्षेत्र (प्रादेशिक ) हद्दीतील घटना 

रामटेक :- देवलापार वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार करणाची परंपरा सुरूच आहे... त्यामुळे त्या वनक्षेत्रात येणाऱ्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे... गावात लोकांचा रोष वाढत चाललंय आहे...

वाघ वाचले पाहिजेत हे खरे, पण त्याच जंगलात राहणारा आदिवासी सुद्धा जगला पाहिजे हेही तेवढेच खरे! वाघ व मानव यांच्यातील संघर्ष अलीकडे तीव्र होत चालला तरी तो कमी करण्यासाठी मध्यममार्गी भूमिकाच योग्य ठरते... जंगलात राहणाऱ्या मानवी समूहाला विश्वासात घेतले, त्यांना वन्यजीव व्यवस्थापनात सामावून घेतले तर संघर्षही कमी होईल व वाघाचे मरणेही थांबेल... ह्याच वनक्षेत्रात चौदा दिवसा अगोदर देवलापार वनपरिक्षेत्रातंर्गतचा करवाही मधील छवारी शिवारात विक्की बाळकृष्ण बोपटे वय २५ वर्ष दि. (८) शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जनावर चराई साठी घेवून गेलेल्या गुराखी वर नाल्याच्या काठावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन ठार केले... त्या मुलाची चौदावी होत नाही तर वाघाने आता दुसरी शिकार केली... ह्या घटना होत असुन वन अधिकारी झोपा काढत आहे...

सविस्तर माहीती देवलापार वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) हद्दीत येणाऱ्या ग्रामपंचायत वडंबा अंतर्गत असलेल्या नवेगाव येथील एका शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दि.(२१) जून रोजी सांय५ च्या सुमारास घडली...वडंबा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या नवेगाव येथील रहिवासी धनराज मनिराम नैताम वय ५२  वर्ष. हे शेतकरी असून त्यांच्याकडे शेतीला पुरक धंदा म्हणून दुधाळ जनावरे आहेत.. दिवसभर शेतीचे काम आटोपून व जनावरे घरी परत नेत असतांना शेतशिवारात लपून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करुन गंभीर जखमी करुन त्यात त्याचा घटना स्थळीच मृत्यु झाला...

      घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी धाव घेतली व जखमी शेतकर्‍याला ग्रामीन रुग्णालय देवलापार येथे आणले असता डाँक्टरांनी त्याला मृत घोषीत केले... तसेच घटनेची माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व वनविभागाची टीम व देवलापारचे ठाणेदार राजेश पाटील आपापल्पा ताफ्यासह घटनास्थळी पोहचून परीस्थीती पाहणी व पंचनामा केला असुन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीन रुग्णालयात ठेवण्यात आले आहे... 

    यावेळी सभापती चंद्रकांत कोडवते, जि.प.सदस्य हरीश उईके, जि. प. सदस्य शांताबाई कुमरे यांना घटनेची माहीती मिळताच सर्वानी रुग्नालयाकडे धाव घेतली... देवलापार भागातील आदिवासी नागरीकात मध्ये मोठा रोष वनविभागावर निर्मान झालेला असुन वेगळी भुमिका घेतली जाण्याची शक्यता आहे...

अर्धा तासातच केली वाघाने म्हैसची शिकार..

वाघाने धनराज यांच्यावर हल्ला केल्यावर त्यांची जनावर भयभीत होवून सैरावैरा पळू लागली... त्यामुळे वाघाला शिकार करता आली नाही... त्याच परीसरातील जूनेवानी रस्तावर वडंबा येथील रहवासी शंकर बावीसताले यांची दुधाळ म्हैसची शिकार केली...

Post a Comment

Previous Post Next Post