महाराष्ट्र वेदभुमी

योगा दिवस साजरा

 


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

रामटेक :- स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय,रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या ब्रह्मांड सभागृहात आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते...

या दिवसाचे औचित्य साधून प्रा.अनिल मिरासे यांनी वेगवेळ्या योगासनांचे प्रदर्शन करून उपस्थित सर्व प्राध्यापक ,इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना योगासने करण्याचे आव्हान केले व सर्वांना योगासन करायला सांगितले तसेच योगासनांचे महत्व सर्वांना पटवून सांगितल यावेळी बी.ए. सी.एस विभाग प्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड विभाग प्रमुख प्रा.शालू वानखेडे, NAAC समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.किरण शेंद्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर तसेच इतर प्रा.कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.मयुरी टेम्भुरने, प्रा.आकाश मोहबिया, अतुल बुरडकर, राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, निकिता फाये, सतीश कळंबे, सुनील पोटभरे, स्नेहा गाथे, संदीप ठाकरे इत्यादिसह विद्यार्थी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post