महाराष्ट्र वेदभुमी

वट पौर्णिमेसाठी वट वृक्षाची तयारी

 


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

 रामटेक :- शितलवाडी येथील महारुद्र हनुमान मंदिर येथील ट्रस्टच्या सदस्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून मंदिर परिसराची साफसफाई केली... तेथेच उभे असलेले वटवृक्षाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात काडीकचरा झालेला होता... २१ तारखेला वटपौर्णिमा आहे... हे लक्षात घेता ट्रस्टच्या सदसयांनी व मित्रपरिवार यांनी वटवृक्षाच्या अवतीभवती असलेला सर्व काळी कचरा साफ केला तसेच झाडाचे योग्य रीतीने छाटणी करून वटवृक्षाचे संगोपन केले... वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला मोठ्या भक्ती भावाने वटवृक्षाची पूजा करतात...पुढच्या सात जन्मी हाच पती मिळू दे अशी वृक्षाकडे आराधना करतात म्हणून पुरुषांनी पण समोर होऊन सर्व महिलांची मदत करण्याच्या अनुषंगाने त्या वटवृक्षाची साफसफाई केली... 

        यावेळी महारुद्र मंदिराचे अध्यक्ष उमेश शेंडे ,उपाध्यक्ष अविनाश चन्ने, सचिव प्रवीण भिवगडे, प्रवीण गिरडकर, सुनील कुदमुलवार , दीपक रोकडे, संजय शिनगारे , दिलीप हटवार ,प्रवीण कुर्वे, देवचंदजी मेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post