प्रतिनिधी (अजय शिवकर)
आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही जगात एकच असे न्यायालय आहे तिथं सर्व गुन्हे माफ केले जातात ते म्हणजे आईचे ह्रदय आमच्या मातोश्री इंदुबाई रामदास गावंड यांचा मृत्यू दिनांक ०२/०६/२०२४यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले..
गावंड परिवारातील मायेची शाळ हरपली........ कै. इंदुबाई रामदास गावंड . मृत्यू दिनांक २/६/२०२४ वय वर्ष ८५.
त्यांच्या पश्चात ०९ मुले, ०९ सुना, २४ नातवंड , २० पतवंड , ०७ नाथ सुना , ०७ नात जावई आईचा स्वभाव म्हणजे मायेची सावली, गोड स्वभाव, शुद्ध वाणी, संगीत प्रेमी, हसतमुख चेहरा, व्यवहार चातुर्य, योग्य निर्णय शक्ती, नऊ मुलांची आई संसाराचा गाडा अगदी कष्टाने ओढत सर्व मुलांना उत्तम शिक्षणदिले डॉक्टर, शिक्षक, प्राचार्य, ग्रामसेवक, औषध निर्माता अशी विविध क्षेत्रात मुले भूमिका बजावत आहेत...
आईला श्रद्धांजली म्हणून दि. 04/06/24 ते दि. 13/06/ 24 दररोज हरिपाठ, स्वर्ग रोहन अध्याय आणि भजन कीर्तन यांचे आयोजन केले होते...
आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवस कार्याला वैयक्तिक वस्तू/भेट न देता मंदिरे आणि ज्ञानमंदिरांना आर्थिक व वस्तूरूपी भेटी देऊन समाजोपयोगी एक नवा पायंडा आमच्या गावंड परिवारामार्फत घातला गेला आहे . या आधीही वहिनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशाच प्रकारची मदत केली आहे. तेराव्या कार्यानिमित्त कै. इंदुबाई रामदास गावंड यांच्या स्मरणार्थ विठ्ठल रखुमाई मंदिर आवरे या ठिकाणी देणगी रूपाने १०००००/-( एक लाख रुपये), संत साईबाबा प्राथमिक शाळा नवीन पनवेल या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर,साई मंदिर आवरे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन भागशाळा खोपटे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर, भोलानाथ मंदिर अवरे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर तसेच ०६ सिलिंग फॅन आईच्या आठवणीनिमित्त देण्यात आले...
सांत्वनासाठी माननीय आमदार श्री जयंत भाई पाटील, माजी नगराध्यक्ष माननीय जे एम म्हात्रे साहेब, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते मा. श्री प्रितम म्हात्रे ,माजी आमदार मा. श्री. मनोहर शेठ भोईर, मा.श्री. आमदार महेश बालदी, माजी शिक्षक आमदार मा. श्री बाळाराम पाटील, माजी सभापती मा. श्री काशिनाथ पाटील, माझी सभापती श्री.नरेश घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.दिलीप परदेशी,माजी उपसभापती सौ.वैशाली पाटील, श्री मेघनाथ तांडेल, शे.का पक्ष तालुका चिटणीस श्री विकास घरत, माजी पंचायत समिती सदस्य श्री. रमाकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. जीवन गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.विनोद म्हात्रे, श्री एकनाथ म्हात्रे पनवेल महानगर प्रमुख उद्धव शिवसेना, वरील सर्व तसेच पंचक्रोशीतील मान्यवर ज्ञात अज्ञात तसेच नातलग व विविध क्षेत्रातील मान्यवर हे गावंड कुटुंबीयांच्या दुःखात दुखवटा व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी झाले...
