महाराष्ट्र वेदभुमी

रोटरी क्लब आँफ मुंबईतर्फे १० जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग किट व वह्या भेट

माणगांव :- (नरेश पाटील

रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लबच्या माजी अध्यक्षा काजल थडानी,  संचालक आणि माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र  दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून  १० जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग किट व वह्या भेट स्वरूपात देण्यात आल्या... 

    सदर कार्यक्रम दि. २० जून रोजी रा. जि. प. शाळा खांदाड येथे पार पडला. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा  काजल थडानी, संचालक दत्ताराम शिंदे, माणगांव नगर पंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, डॉ. संतोष कामेरकर, मा. पं. स. स. शैलेश भोनकर, खांदाड शाळा समिती अध्यक्ष महेश पोवार, उपाध्यक्ष कैलास पोवार, समाजसेवक विजय शिंदे, महेश महादेव पोवार, संजय मालोरे, अर्बन, मुख्याध्यापक वेदपाठक, अंबूर्ले, संगीता धुमाळ, मा. ता. प. से. संघ अध्यक्ष प्रमोद जाधव, उपाध्यक्ष सुनील राजभर, कार्याध्यक्ष परेश शिंदे, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते...

    रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन  दत्ताराम पांडुरंग शिंदे व आरती दत्ताराम शिंदे हे माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे रहिवाशी आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक व सरकारी रुग्णालयात आवश्यक असणारी साधन व्यवस्थांची व मशनिरिंची चांगली माहिती असून त्यांनी त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत...या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या मातृभूमी असलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हाती घेवुन क्लबच्या सहकार्याने सेवाभावी काम करीत आहेत. तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा नांदवी,  रा. जि. प. शाळा शिरवली आदिवासीवाडी, साले, चांदोरे, डोंगरोली, उतेखोलवाडी, तारणे, खांदाड, कणघर या ९ शाळांना आँनलाईन शिक्षणाकरिता ई-लर्निंग किट व वह्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका विनया जाधव यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post