रोहा - प्रतिनिधी
रोह्यातील विद्यार्थीप्रिय निवृत्त प्राथमिक शिक्षिका शांताबाई गडकरी यांचे काल एक जून रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ९४ वर्ष्याचे होते. त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे, पतवंडे व खूप मोठा विद्यार्थी परिवार आहे. पत्रकार, लेखक, कवी श्रीनिवास गडकरी यांच्या त्या मातोश्री होत...
इंदापूरचे उद्योजक दत्ता व बाळशेठ कूळकर्णी यांच्या भगिनी आणि स्वतंत्रसैनिक स्व. भाई गडकरी यांच्या त्या पत्नी होत्या. त्या काळात वयाच्या सोळाव्या वर्षीचं त्या नोकरीला लागल्या. त्यांची बरीचशी नोकरी रोहा गावात व आजूबाजूच्या परिसरात झाली. विद्यार्थी व सहकारी शिक्षकांमध्ये त्या चागल्या शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होत्या...
शेवटची बारा वर्षे त्या मुख्याध्यापिका होत्या. पण त्यांची खरी ओळख भर सभेत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावणाऱ्या निर्भीड शिक्षिका म्हणूनच होती. १९८२ सालची ती घटना आहे. शिक्षकांच्या एका मोठ्या सभेत मुख्यधिकारी, मामलेदार, लोकंप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत त्या वेळचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिक्षिकाना अतिशय अपमानस्पद वागणूक देत होते. तेव्हा गडकरी बाई यांनी भर सभेत उन्मत्त सत्ताधाऱ्यांना सुनावलं होतं... " आम्ही शिक्षिका म्हणजे ऐऱ्यागैर्या समजू नका. त्यावेळी " क्षमा मागा म्हणून वरीष्ठा कडून त्यांच्या वर दबावं आला होता.. पण त्या बधल्या नव्हत्या. त्यामुळे शिक्षक वर्गात त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरानीं यावेळी गडकरी किटुंबियांचे सांत्वन केले...
