माणगाव :- (नरेश पाटील)
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पोस्को महाराष्ट्र कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन व नियमित रक्तदात्यांचा सन्मान.
१४ जून हा जागतिक रक्तदाता दीन म्हणून साजरा केले जाते... या दिनाचा औचित्य साधून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी मध्ये यंदाही हा कार्यक्रम चालु ठेवत १२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले... तसेच नियमित रक्तदात्यांचा सन्मान पोस्को चे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. इन क्यो बे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाची सांगता रक्त दानाची शपथ घेऊन करण्यात आली...
पोस्को स्टील कंपनी सामाजिक कार्यात सर्वात आघाडी असणारे आहे. यात विशेषकरुन ग्रामीण तसेच दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक उपक्रम राबविणे, करियर मार्गदर्शन कार्यशाळा, आयोजन करणे, शहरातील सुशोभीकरण उभी करून देणे, रस्त्याचे अपघात काळात असो किंबहुना ग्रामीण भागातील रुग्ण यांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावे म्हणून कंपनीचे अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहे तर अश्या विविध बाब गेली अनेक दशकांपासून अविरत कार्यात असताना त्यात भर म्हणून रक्तदान सारख्या पवित्र उपक्रम हाती घेवून गर्जुवंत रुग्ण यांना मिळावे म्हणून ही कंपनी सतत पुढे असते. या बाबत शासन स्थरिय नोंद होवून पॉस्को कंपनीचा हा अनोख उपक्रम दखल घेतली गेली पाहिजे. दरम्यानचा काळात नियमित रक्तदान शिबिराचे उपक्रम राबवित असल्याने जनकल्याण रक्त केंद्र महाड चे व्यवस्थापक श्री. महेश मोरे यांनी ही पोस्को कंपनी प्रशासनाचे आभार मानले व नियमित रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सन्मानित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत, रक्तदान करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले तसेच ही संधी निर्माण केल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे देखील आभार मानले...
दरम्यानचा काळात आयोजित ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये एकूण कंपनीचे ६९ कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला आणि स्वेच्छेने रक्तदान केले...ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी या उपक्रमामुळे मोठा हातभार लागणार आहे... अशा सातत्यपूर्ण शिबिराचे आयोजन करून रक्तदान करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे पोस्को महाराष्ट्राचे मत आहे... महाराष्ट्रात रक्तदानाची चळवळ नवीन नाही पण तरीही ऐच्छिक रक्तदान पुरेसे नाही त्यामुळे अशा शिबिरांची आणि रक्तदात्यांची संख्या नियोजनबद्ध पद्धतीने वाढवणे आवश्यक असल्याचे काळाची गरज बनली आहे...
