महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे गावात शिवराज्याभिषेक सोहळा हर्ष जल्लोषात साजरा



केळवणे-पनवेल/६ जून/अजय शिवकर/ 

भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग म्हणजे  अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवरायांचा शिवराज्याभिषेक .ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक होऊन महाराज छत्रपती बनले,  शिवरायांचा राज्याभिषेक हा पावन दिवस संपूर्ण हिंदुस्थानातील शिवप्रेमी मोठ्या थाटामाटाने दर वर्षी साजरा करतात...

केळवणे गावातही ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला...

सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते राज्यभिषेक आणि अश्वारूढ  पुतळ्याचे पूजन करण्यात आले...

दुर्गसेवक सह्याद्रीचे या ग्रुपतर्फे या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले...

या सोहळ्यासाठी गावातील सर्व शिवप्रेमी, ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ज्येष्ठ मंडळी आदी मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला...

Post a Comment

Previous Post Next Post