महाराष्ट्र वेदभुमी

जय बजरंग मल्लखांब आखाडा पुगाव मंडळाच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा केला सत्कार.


पुगाव रोहा (नंदकुमार कळमकर) 

रोहा तालुक्यातील कोलाड खांब परीसरात नावलौकिक असलेल्या जय बजरंग मल्लखांब आखाडा पुगाव यांच्या वतीने यंदाच्या वर्षात बोर्ड परीक्षेत पास झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी वर्गाचा सत्कार या मंडळाच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केला...


रोहा तालुक्यात पुगांव येथील मल्लखांब आणि आखाडा खेळात अग्रेसर असलेल्या या तरुणांनी एकत्रित येऊन एक अनोखा उपक्रम राबवत इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार जय बजरंग मल्लखांब आखाडा पुगांव यांच्या तर्फे मोठ्या उत्साही वातावरणात त्यांच्या राहत्या घरी आई,वडील,आदी कुटुंबीय समावेत करण्यात आला...



तालुक्यातील पुगाव गावातील विद्यार्थ्यांनी माध्यमिक आणि उच्यमाध्यमिक शाळांत इयत्ता दहावी बारावी परीक्षेत चांगले यश मिळवले असून गावाची शान आणि अभिमान आहे त्यामुळे येथील जय बजरंग मल्लखांब आखाडा पट्टू सर्वांनी एकत्रित येऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या...


Post a Comment

Previous Post Next Post