महाराष्ट्र वेदभुमी

विद्यार्थ्यांना रोड सुरक्षा पेट्रोलच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी अधिकारी सज्ज :सहाय्यक उपनिरीक्षक वसंतराव कदम,

 


रोहा :- प्रतिनिधी 

आर. एस. पी. शिक्षक अधिकारी प्रशिक्षण संपन्न.

रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण पोलीस खाते अंतर्गत रोड सेफ्टी पेट्रोल या विषयाचे ट्रेंनींग रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कळंबोली येथील हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आले. त्या दृष्टीने दहा दिवस ड्रील, सिग्नल पी. टी, विद्यार्थ्यांची मानसिकता, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, प्राथमोपचार, अग्निशमन, फायर आणि सेफ्टी, विद्यार्थ्यांचे माणसशास्त्र, झेंडा बांधणे असा सर्व तीन महिन्याचा अभ्यासक्रम दहा दिवसांत शिकविण्यात आला. सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत हा कार्यक्रमात सतत चालू होता. यातून शिकून विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी पेट्रोलच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी अधिकारी सज्ज झाले असल्याचे सहाय्यक उपनिरीक्षक वसंतराव कदम म्हणाले. रविवारी 5 मे रोजी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनाझेशन कोल्हापूर महाराष्ट्र राज्य शिक्षण व पोलीस खाते अंतर्गत आर. एस. पी. व सी.डी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबीर कळंबोली हायस्कुल मध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक वसंतराव कदम 102 आर ए एफ बटालियन, हवालदार परदेसी,  शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कळंबोली हायस्कुल चे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे, महाराष्ट्र राज्य आर. एस. पी. महासमादेशक अनील कुंभार, कोकण विभाग समदेशक विलास पाटील, नवी मुंबई अतिरिक्त समादेशक देवेंद्र म्हात्रे, जिल्हा समादेशक शरद कुंभार, ठाणे जिल्हा समदेशक शीतलकुमार शिंदे, हणमंत डुबल, समादेशक फिरोज सय्यद, ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक, मंगेश जाधव प्रशिक्षनार्थी आर. एस. पी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खारघर समादेशक ललिता सिंग, नलिनी पाटील उपस्थित होते...

प्रतिक्रिया

आर. एस. पी. अधिकारी प्रशिक्षण सुरु असताना प्रशिक्षणार्थी यांची राहण्याची व्यवस्था कळंबोली हायस्क्यूलचे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे सर यांनी केली. या बॅच साठी बटालियनचे जवान यांनी खुप मेहनत घेतली. प्रशिक्षणार्थी यांनी सिग्नल पिटी सुद्धा चांगल्या प्रकारे केली.


विलास पाटील 

समादेशक, कोकण विभाग

प्रतिक्रिया 

दहा दिवस प्रशिक्षण घेऊन आज खऱ्या अर्थाने प्रशिक्षणार्थी हे आर. एस. पी अधिकारी झाले आहेत. तीन हजार शिक्षक आपल्या आर. एस. पी ऑर्गनायाझेशन मध्ये काम करत आहेत. आता शाळेत युनिट सुरु करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात.

महासमादेशक, अनील कुंभार

प्रतिक्रिया

आर. एस. पी. च्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी हे आपापल्या शाळांमधून चांगले काम करून दाखवतील. कित्येक आर. एस. पी. च्या ट्रेनिंग या मैदानावर झाल्या पण यावर्षी जी परेड बसली तशी कधीच बसली नाही. त्यामुळे ही बॅच अधीक उल्लेखनीय आहे. शाळेमध्ये मी राऊंड मारेन त्यामुळे आपण घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी वापरा असा सल्ला दिला.

राजेंद्र पालवे मुख्याध्यापक, कळंबोली हायस्कुल

Post a Comment

Previous Post Next Post