सोगाव - अब्दुल सोगावकर :
सारळ येथील मतदान केंद्रावर मतदाराला आली चक्कर, वेळीच उपचार केल्यामुळे अनर्थ टळला
रायगड लोकसभा मतदारसंघात ७ एप्रिल २०२४ च्या निवडणुकीच्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास महाड तालुक्यातील एका मतदाराला चक्कर आल्यामुळे मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटनेची बातमी समाजमाध्यमामध्ये(सोशल मीडियावर) पसरली होती, या घटनेच्या काहिशी मिळतीजुळती घटना अलिबाग तालुक्यातील सारळ येथील मतदान केंद्रामध्ये एका पुरुष मतदारासोबत घडली, मतदानासाठी आलेल्या एका पुरुष मतदाराला अचानक चक्कर आल्यामुळे उपस्थित पेढांबे वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका, आशा वर्कर यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली. मात्र यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यात यश मिळाले...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारळ येथील मतदान केंद्रावर सकाळी अकराच्या सुमारास एक पुरुष मतदार गणेश गुरुनाथ वाघमारे वय 37 मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्यास चक्कर आली, यावेळी मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना उन्हामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते, त्या वैद्यकीय पथकाने तातडीने मतदार रुग्णाची तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून पेढांबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, काही काळ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करून व रुग्ण बरा झाल्याची खात्री करून घरी सोडून देण्यात आले...
यावेळी अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी सपकाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी श्री.वसुदेव गुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती पाटील तसेच आशा वर्कर यांनी महत्वाची भूमिका बजावत मतदार रुग्णावर वेळीच उपचार केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...
फोटो लाईन : सारळ येथील मतदान केंद्रावर चक्कर आलेल्या मतदारावर उपचार करताना वैद्यकीय पथक,
