महाराष्ट्र वेदभुमी

चिल्हे गावचे सदानंद लोखंडे यांचे दुःखद निधन.



कोलाड (श्याम लोखंडे)

 रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील कष्टकरी शेतकरी तथा सामजिक कार्यकर्ते सदानंद गंगाजी लोखंडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या सत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर तर चिल्हे गावासह परीसरात शोककळा पसरली आहे...

सदानंद लोखंडे हे प्रेमळ शांत आणि मनमिळावू स्वभावाचे होते सुरुवातीच्या काळात ते मुंबई येथे एका हॉटेल मधे काम करत होते प्रामाणिक पणे काम करत त्यांनी आपले कुटुंब सांभाळत मुलांना ऊत्तम शिक्षण दिले घरच्या शेती व्यवसायात पत्नीचे ऊत्तम योगदान लाभले मात्र पत्नीचे अचानक निधन झाल्याने कुटुंबासह शेती कामाची जबाबदारी त्यांच्या अधिक खांद्यावर पडली आणि शेती व्यवसायात रमले घरच्या शेती कामाची जबाबदारी तसेच साऱ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली...

गावात विविध कार्यक्रमात नेहमी सहभागी होणारे सदानंद यांच्या अचानक जाण्याने लोखंडे परिवारावर दुःखाचे डोंगर तसेच चिल्हे गावासह परीसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली, पुतणे ,सूना,जावई,भावजय, नातवंडे असा मोठा लोखंडे परिवार असून त्यांच्या पुढील दशक्रिया विधी सोमावारी १३ व उत्तरकार्य  तेरावा गुरुवारी १६ मे रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे चिल्हे येथे पुष्प श्रध्दांजली अर्पण करून संपन्न होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post