महाराष्ट्र वेदभुमी

पुणे येथील हरवलेल्या महिलासह प्रियकराला रोहा पोलीसांनी घेतले ताब्यात...

 

शहानवाज मुकादम/रोहा

दि: 03 एप्रिल 2024

 रोहा : दिनांक 02/05/24 रोजी हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पुणे येथील मनुष्य मिसिंग नंबर 95/ 2024 मधील मिसिंग महिला नामे सौ श्रुतिका संदीप लोखंडे वय 28 वर्षे राहणार मान तालुका मुळशी जिल्हा पुणे ही महिला दिनांक 25 /04/ 2024 रोजी पासून मिसिंग असल्याबाबत तपासी अंमलदार स.फो. परकाळे यांनी मेल द्वारे तसेच फोन द्वारे संपर्क साधून सदर मिसिंग मधील महिला हिचे मोबाईल लोकेशन रोहा पोलीस ठाणे हद्दीत असल्याबाबतचे माहिती देऊन तिचा शोध घेणे बाबत विनंती करण्यात आली होती.

 रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री देवीदास मुपडे यांच्या आदेशाने सदर महिलेचा मोबाईल क्रमांक चे प्राप्त लोकेशन अन्वये धाटाव, वरसे, रोहा शहरात शोध घेण्यात आला, परंतु सदर क्रमांकाचा मोबाईल वारंवार चालू बंद होत असल्याने शोध घेण्यास अडथळा येत होता. 

 आज रोजी रोहा पोलीसांकडून पुन्हा सदर क्रमांकचे प्राप्त लोकेशन  अन्वये  तसेच तांत्रीक विश्लेषण करून हरवले महिलेचा शोध घेतला असता सदरची महिला आज दिनांक 03/05/ 2024 रोजी रोहा रेल्वे स्टेशन येथे नेत्रावती एक्सप्रेस या ट्रेनमध्ये चढत असताना आढळून आली.

 रोहा पोलीसांना सदर ची महिला व   तिच्यासोबत असलेला तिचा प्रियकर नामे चिराग दिनेश राठोड वय 27 वर्षे राहणार उत्तम नगर पुणे यांना ताब्यात घेण्यात आला.

  त्यांच्याकडे नाव गावाची विचारपूस केल्यानंतर व खात्री झाल्यानंतर त्यांना रोहा पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन सदर बाबत रोहा पोलीसांकडून वरिष्ठांना माहिती देण्यात आली,  तसेच संबंधित हिंजवडी पोलीस ठाणे येथे ही माहिती देण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. देवीदास मुपडे यांच्या आदेशान्वये  सह पोलिस निरीक्षक श्री ऐदाळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post