शहानवाज मुकादम/रोहा
रोहा : तालुक्यातील खैरे खुर्द च्या अंगणवाडी सेविका मुसर्रत हुसेन रोगे यांचा सेवानिवृत्ती सत्कार निरोप समारंभ सोहळा थाटात संपन्न...पंचायत समिती रोहा अंतर्गत येत असलेल्या खैरेखुर्द अंगणवाडी येथे पदावर कार्यरत असलेल्या सेविका श्रीम, मुसर्रत हुसेन रोगे ह्या दिनांक 30 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने एनइएस हायस्कूल च्या वतीने रोगे आपाजान यांचा सत्कार व निरोप समारंभ दि:1 मे 2024 रोजी मोठ्या थाटात पार पडला...
रोगे आपाजान यांनी 32 वर्षे प्रदिर्घ काळ सेवा पूर्ण केली असून सर्वांच्या लाडक्या असुन नियत वयोमानानुसार 32 वर्ष सेवा करून निवृत्त झाल्या...
एन इ एस उर्दु हायस्कूल खैरे खुर्द येथे 1मे 2024रोजी निरोप समारंभ या कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली, त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अपाजान सोबतच्या मधुर आठवणींना उजाळा देत भविष्या साठी शुभेच्छा दिल्या...
मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला यांनी अपाजान चे मनमिळाऊ व सेवातत्पर वृत्ती, कार्यशील व शिस्तबंध आचरण, बदलत्या युगा नुसार अपडेट ठेवणे संगणकीय ज्ञान आत्मसात करणे अश्या अनेक बाबींवर प्रकाश टाकत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या...
मौलाना रझाउल्ला आझमी यांनी ही अपाजान यांना 32वर्ष सेवा पूर्ती साठी अभिनंदन केले व भविष्या साठी शुभेच्छा दिल्या...
शिक्षक वर्ग सारा मुकादम, अर्बिना मुकादम, आजमीना मुकादम,रशमीन मॅडम मैमुना मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते...
या वेळी सर्व मान्यवरांनी सत्कार मुर्तीच्या जीवनावर प्रकाश ज्योत टाकला व पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले...
सत्कार समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना सेविका मुसर्रत रोगे (आपाजान) यांनी एनइएस हायस्कूल खैरेखुर्द च्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्गाला कूतज्ञता व्यक्त करून दिलेले प्रेम, मानसन्मान व सेवा कालावधीत केलेले सहकार्य कधीही विसरणार नाही असे भावनिक मत व्यक्त केले...
तसेच शिक्षक प्रेमी रशमीन खोत,अर्बिना मुकादम, साहरा मुकादम इत्यादी ने आपण अपाजान चे विद्यार्थी आहोत व त्यांच्यापासून आपण खूप चांगलं शिकलो म्हणून त्यांचे धन्यवाद मानले व आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता झाली...
