माणगाव :- (नरेश पाटील)
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ३१ में जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असताना त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय अलिबाग़तर्फे उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे दि.३१ में २०२४ रोजी तंबाखू विरोधी व्याख्यान आयोजित केले होते..त्यामध्ये तंबाखू सेवनामुळे शरीरास होणारे गंभीर दुर्दर आजारासंबंधी रुग्णाकरीता प्रबोधनापर मार्गदर्शन करण्यात आले..त्यानंतर दंतरोगतन्य डॉ.प्रथमेश बुधे, डॉ तेजस्विनी शिंदे तसेच दंतसह्यक नितीन धोत्रे यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले आणि तंबाखू सेवन न करण्याची उपस्थितांना शपथ दिली...
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालय, माणगावचे वैद्यकीय अधीक्षक ड़ॉ.सचिन गोमसाळे होते... व सामाजिक कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिति होती..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेट्रोन मॅडम लता राठोड आभार प्रदर्शन सिस्टर इंचार्ज सौ.शिवकांती गवळी यानी करून कार्यक्रमाची सांगता झाली...
कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय माणगावचे सर्व कर्मचारी तसेच दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते...दरम्यानचा काळात माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा नियमित चालु असताना समाज प्रबोधनाचे विविध उपक्रम हाती घेवून जनजागृती अभियान राबविण्यात अग्रेसर असल्याचे सतत पाहायला मिळत असते...
