महाराष्ट्र वेदभुमी

अलिबाग रेवस मार्गावर वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ अपघात एक ठार तिघेजण जखमी



सोगाव - अब्दुल सोगावकर :

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड मित्रपरिवारांसह अपघातस्थळी मदतीला दाखल

 अलिबाग रेवस मार्गावर बुधवार दि.२९ मे रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ पायल हार्डवेअर समोर भयानक अपघात झाला. यामध्ये हलगर्जीपणाणे एक पादचारी रस्ता ओलांडत असताना रेवस बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक बसून तो पादचारी जखमी झाला, यावेळी धडक दिलेल्या दुचाकीने समोरून म्हणजे अलिबाग कडून रेवस बाजूकडे येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने त्या दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेजण भररस्त्यात पडून गंभीर जखमी झाले. यातील दुचाकी वरील एक तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले...

           सदर अपघाताबाबत अलिबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. २९ मे रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान आरोपी सागर दिगंबर मानूर रा. राजमळा, ता.अलिबाग हा आरसीएफ गेट समोरील पायल हार्डवेअर समोर अचानकपणे रस्ता ओलांडत रस्त्याच्या मधोमध धावत आल्याने समोरून फिर्यादी व जखमी क्र.२ हे आपल्या पॅशन प्रो क्र. एम. एच. ०४ इ झेड १००७ ह्या क्रमांकाची दुचाकी घेऊन जात असताना त्यांच्या दुचाकीला जाऊन अचानकपणे धडकला, पायी जाणाऱ्या इसमाच्या धडकन्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची धडक समोरून येणाऱ्या फिर्यादी यांच्या मोटारसायकलला धडकून अपघात झाला, यावेळी सदर पादचारी इसम सागर दिगंबर मानूर याच्या हलगर्जीपणामुळे अपघात होऊन मोटारसायकल चालक अक्षय अनिल राणे मु. भादाणे, पो. बामणगांव, ता.अलिबाग याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. यामध्ये फिर्यादी हे देखील गंभीर जखमी झाले...

            या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता आपल्या पिंट्या गायकवाड मित्रमंडळाच्या मित्रपरिवारांसह व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन अपघातात सर्व गंभीर जखमी झालेल्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामुळे तिघांचे जीव वाचविण्यात यश मिळाले...

          या अपघाताची फिर्याद जखमी फिर्यादी मिलिंद वसंत सुर्वे(वय ५०), रा. मुलुंड, गव्हाण पाडा, मुलुंड ईस्ट, सध्या रा. किहीम आणि शैलेश सुरेश करळकर, रा.नालासोपारा, यांनी पोलिसांना दिली आहे..

          या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक तपासानुसार आरोपी सागर दिगंबर मानूर, रा. राजमळा, ता. अलिबाग याच्यावर ३० मे रोजी रात्री ३:१० वा. नोंद क्र. ०६, सी. आर. नं. १३४/२०२४ भा.द.वि.स.क कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड हे करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post