सोगाव - अब्दुल सोगावकर :
३२रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत मापगाव हद्दीतील मतदान केंद्रावर सकाळी अकरा पर्यंत समिश्र प्रतिसाद पहायला मिळाले, सोगाव, मापगाव, बहिरोळे व मुशेत येथील मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या वतीने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करण्यात सहज व सुलभता व्हावी यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच मतदार यांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे...
मापगाव विभागात बहिरोळे येथे सर्वात जास्त मतदान झाल्याचे सांगितले जात आहे, यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, काँग्रेस पक्षाचे मापगाव विभाग सरचिटणीस विवेक जोशी, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, पांडुरंग माने, समीर माने, सूचित थळे यांनी बहिरोळे येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तसेच सर्व मतदारांनी देशाच्या उज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन मतदारांना केले...
*फोटो लाईन :* रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व त्यांचे इतर सहकारी मतदानाचा हक्क बजावल्या नंतर,
