शहानवाज मुकादम/रोहा
म्हसळा व श्रीवर्धन वनविभागाचे वनक्षेत्रपाल पंढरकामे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी छावा संघटनेचे अझहर धनसे यांची मागणी...
रोहा: सध्या सर्वत्र तापमानाचा पारा चढत असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असल्याचे दिसून येत आहे. या वर्षीच्या उकाड्याने सर्वांनाच अगदी हैराण करून सोडले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच म्हसळा तालुक्यातील कुडगाव येथे मोठ्या प्रमाणात वणवा लागला असून आजतागायत आग धुमसत असताना वनविभागाकडून सदरची आग विझवण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येते. म्हसळा आणि श्रीवर्धन या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून या जंगलांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी मोठ मोठया प्रमाणात वणवे लागत असल्याचे दिसून येत आहेत.मात्र वनविभागचे अधिकारी हि बाब गांभीर्याने घेत नसून दोन्ही तालुक्यांतील वनविभागाचे अधिकारी वनव्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप छावा मराठा योद्धा संघटनेचे म्हसळा तालुकाध्यक्ष अझहर धनसे यांनी केला आहे...
सर्वत्र शासन आणि प्रशासन झाडे लावा, झाडे जगवा. सांगत असते.. वन्य प्राण्यांना वाचवा असे वर्षभर म्हणत असते. आणि ज्या काळात म्हणजेच मार्च ,एप्रिल, मे या महिन्यांमध्ये खऱ्या अर्थाने जंगल वाचवणे आवश्यक असते कारण या दरम्यान प्रचंड तापमान वाढत असते , पाण्याची हि कमतरता भासत असते आणि याच दरम्यान पाळीव तसेच वन्य प्राण्यांना देखील पाण्याची कमतरता भासत असताना शासन यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेत आहे हि आश्चर्याची बाब आहे.. .सोबतच जंगलांमध्ये लागणार्या आगीच्या (वणव्याच्या) समस्येमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन सामग्रीचे नुकसान होत असताना सोबतच अनेक वन्य प्राण्यांना या वणव्यांमुळे आपला जीव देखील गमवावा लागत असून वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती यामुळे सध्या लुप्त होत चालल्या असल्याचे पहावयास मिळते आहे..
तर याबाबत म्हसळा आणि श्रीवर्धन वन विभागाचे वन क्षेत्रपाल पंढरकामे हे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने पंढरकामे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. अशी मागणी छावा मराठाग योद्धा संघटनेचे म्हसळा तालुकाध्यक्ष अझहर धनसे यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे केली असल्याचे दिसून येते...

