महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब कोलाड आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कोलाड :- प्रतिनिधी

शंभरहून अधिकांची तपासणी तेरा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया.

रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीतील श्री क्षेत्र नडवली येथे अखंड हरिनाम सप्ताहचे औचित्य साधून या परिसरात तसेच कोलाड विभागात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोलाड लायन्स क्लबच्या वतीने येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याला येथील रुग्णांनी भरभरुन प्रतिसाद देत असंख्ये भाविकांनी याचा लाभ घेत डोळ्यांची तपासणी केली...



लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3221 ए 4 च्या कृपाशीर्वादाने रोहा लायन्स क्लब, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निलिकॉन कंपनी लिमिटेड धाटाव यांच्या सौजन्याने तसेच कोलाड लायन्स क्लब डॉ गांधी नर्सिंग होम कोलाड यांच्या वतीने आणि नडवली ग्रामस्थ, महीला,तरुण मित्र मंडळ व मुंबईकर यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या शिबिरात शंभरहुन अधिक गरजुंच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली असून यात तेरा रुग्णांवर मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे...

गेली तीन वर्षे क्लबचे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत,पराग फुकणे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांचा नेतृत्वाखाली अविरतपणे कोलाड लायन्स क्लब हा या परिसरात विविध उपक्रम राबवित आहे त्यामुळे सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य,पर्यावरण, कला, क्रिडा,सह विविध क्षेत्रात अग्रेसर आहे त्यामुळे येथील सर्वसामान्य भाविकांसाठी या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

यावेळी खांब पंचक्रोशीचे आदिस्थांन हभप दत्तू महाराज कोल्हटकर, पंचक्रोशीचे अध्यक्ष कृष्णा महाराज.जाधव, उपाध्यक्ष प्रकाश महाराज थिटे, मदन महाराज कोल्हटकर गावचे अध्यक्ष किशोर जाधव, सरपंच सौ कांचन मोहिते लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ श्याम भाऊ लोखंडे, खजिनदार नंदकुमार कळमकर,बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे, लायन विश्र्वास निकम, सौ पूजा लोखंडे, सौ रिया लोखंडे,हभप सहदेव महाडिक, धोंडू कचरे, कृष्णकांत धनवी, चंद्रकांत वरखले, चंद्रकांत जाधव, तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबागचे सुजित पाटील , राहुल घरत,प्रतीक कणसे, प्रचिती केणी, सह आदी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले नागरीक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते...

उत्स्पुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात जवळपास शंभरहून अधिकांची तपासणी करण्यात आली असून त्यात तेरा रुग्णांवर मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post